भारतात खरोखरच चार महिन्यांत ‘कोरोना’वर नियंत्रण मिळेल काय ? जाणून घ्या ‘या’ 7 महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील कोरोना व्हायरसचा सर्वात वाईट काळ हा संपलेला आहे हे खरे आहे का? लोकसंख्येच्या एक तृतीयांश भागात अँटीबॉडी विकसित झाली आहे? पुढील चार महिन्यांच्या आत देशात कोरोना नियंत्रित (Corona Control) होईल यावर विश्वास ठेवणे योग्य आहे काय? सरकारने शास्त्रज्ञांची जी एक समिती (Committee of Scientists) स्थापन केली होती, त्यांच्यानुसार फेब्रुवारी 2021 पर्यंत साथीचा आजार संपुष्टात येईल, जर आपण सर्व सावधगिरीचे (Precautions) योग्य रीतीने पालन केले. आता हा दावा कितपत अचूक आहे आणि कसे या निष्कर्षापर्यंत पोहोचावे, यासाठी कोविड आकडेवारी (Covid Statistics) आवश्यक आहे.

आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक एम. विद्यासागर यांच्या नेतृत्वात समितीने देशातील कोरोना संक्रमण साथीच्या संपूर्ण हालचाली समजण्यासाठी नवीन मॉडेलचा उपयोग केला. या अभ्यासामध्ये असे आढळले की सप्टेंबर महिन्यात कोरोना शिगेला पोहोचला होता आणि गेल्या एक महिन्यापासून त्याचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. या अभ्यासात असेही म्हटले गेले आहे की जरी सण-उत्सवांचा आणि हिवाळ्याचा हंगाम समोर असला तरी सप्टेंबरच्या तुलनेत आता ही प्रकरणे कमीच समोर येतील.

देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने या समितीची स्थापना एक महिन्यापूर्वी केली होती, ज्यांनी कोरोनाविरूद्ध सरकारची धोरणे योग्य आणि अचूक असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे आरोग्य मंत्रालयानेही कोविडविरूद्धची रणनीती प्रभावी असल्याचे म्हटले आहे. आकडे काय म्हणत आहेत? या समितीच्या दाव्यांवर कसा विश्वास ठेवला जाऊ शकतो आणि कशा पद्धतीने साथीच्या ट्रेंडल समजले जाऊ शकते? या प्रश्नांची उत्तरे 7 मुद्द्यांमधून समजून घ्या.

1. समितीमध्ये समाविष्ट असलेले आयआयटी कानपूरचे प्रा. मणिंद्र अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार लोकांनी खबरदारी घेणे चालूच ठेवले पाहिजे. केरळमधील ओणम सणानंतर प्रकरणे एकदमच वाढली, म्हणून यातून धडा घेत मास्क, सामाजिक अंतर आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यानेच येणाऱ्या उत्सवांच्या आणि हिवाळ्याच्या हंगामात साथीपासून बचाव करणे शक्य होईल. जर पूर्ण काळजी घेतली गेली तर फेब्रुवारीपर्यंत देशातील परिस्थिती नियंत्रणात येईल.

2. या समितीने असेही म्हटले आहे की जर मार्चमध्ये लॉकडाऊन झाले नसते तर देशाच्या आरोग्य यंत्रणेच्या फारच कमी काळात नाकी नऊ आले असते. जर लॉकडाऊन लागू करण्यात आले नसते तर 26 लाख लोक मृत्युमुखी पडले असते, जर लॉकडाऊन मे मध्ये केले गेले असते तर मृतांचा आकडा 10 लाखांवर पोहोचला असता. मार्चमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळेच रुग्णांच्या मृत्यूंची संख्या जवळपास 1 लाखांच्या दरम्यान राहिली. त्याचप्रमाणे लॉकडाऊन जर झाले नसते तर संसर्गांचे प्रमाण 1.4 कोटी झाले असते. लॉकडाऊनमुळे कर्व्ह फ्लॅटन झाल्याचे समितीने कबूल केले.

3. समितीने हे देखील मान्य केले की मार्च महिन्यात लॉकडाऊननंतर लगेचच मोठ्या संख्येने लोकांचे जे स्थलांतर झाले, त्याचा परिणाम संसर्ग पसरण्याच्या दृष्टीने अगदी किरकोळ होता. समितीच्या म्हणण्यानुसार स्थलांतरितांच्या परतीनंतर जे क्वारंटाईन धोरण आखण्यात आले, ते अत्यंत प्रभावी ठरले. समितीच्या म्हणण्यानुसार भारतातील कोरोनाविरूद्धची लढाई ही चांगल्या पद्धतीने लढवली गेली.

4. सप्टेंबर महिन्याच्या मधल्या काळात जेथे दररोज 80 ते 90 हजार प्रकरणे पहायला मिळत होती, तेथे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सरासरी सुमारे 70 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. मागील आठवड्यात 18 ऑक्टोबर रोजी 61871, 17 ऑक्टोबर रोजी 62212, 16 ऑक्टोबर रोजी 63371, 15 ऑक्टोबर रोजी 67708, 14 ऑक्टोबर रोजी 63509, 13 ऑक्टोबर रोजी 55342, 12 ऑक्टोबर रोजी 66732 आणि 11 ऑक्टोबर रोजी 74383 प्रकरणांची नोंद झाली होती. यामुळे असे गृहित धरले जाऊ शकते की सप्टेंबरच्या तुलनेत नवीन प्रकरणांची संख्या लक्षणीय घटली आहे.

5. आता आकडेवारी काय म्हणत आहे ते जाणून घेऊया. जगातील एकूण लोकसंख्येपैकी एकास सहावा भाग लोकसंख्या ही भारतात राहते आणि जगातील एकूण कोरोना प्रकरणांचा जवळपास सहावा भाग हाच भारतात राहिला. परंतु जगात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंपैकी 10 टक्के मृत्यू भारतात झाले आहेत. इतकेच नाही तर मृत्यूच्या बाबतीत हे प्रमाण फक्त 2% आहे, जी जगातील सर्वात कमी दरातील आकडेवारी आहे. याची अनेक कारणे यापूर्वी सांगितली गेली आहेत.

6. कोरोनाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात 1 लाख 14 हजारांहून अधिक मृत्यू झाले असून सुमारे 75 लाख प्रकरणे नोंदली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या दीड महिन्यात प्रथमच एकूण 8 लाखांपेक्षा कमी सक्रिय रुग्णांची नोंद मागील आठवड्यात झाली. आरोग्य मंत्रालयाने कमी मृत्यू दर, उच्च रिकव्हरी आणि सक्रिय प्रकरणांमध्ये घट होणे यामागे धोरणात्मक कामगिरी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

7. जगभरात कोरोनाची जवळपास 4 कोटी प्रकरणे असून त्यापैकी भारतात 75 लाख प्रकरणे आहेत. जगभरात मृत्यू झालेल्यांची संख्या 11 लाखांपेक्षा जास्त असून त्यापैकी भारतात 1 लाखाहून अधिक मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत सुमारे 82 लाख प्रकरणे आणि 2 लाख 19 हजार मृत्यू तर ब्राझीलमध्ये 52 लाखाहून अधिक प्रकरणे असून 1 लाख 53 हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. त्याचवेळी भारतात सुमारे 75 लाख प्रकरणांमध्ये 1 लाख 14 हजार मृत्यू झाले आहेत.