EPF च्या योगदानात सरकारनं केली कपात, नोकरदारांना ‘फायदा एक अन् नुकसान दोन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविड-१९ संकटात नोकरदारांना अधिक रोख मिळण्यासाठी सरकारने तीन महिन्यांकरिता ईपीएफच्या योगदानात दोन-दोन टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. दोन टक्के कपात नियोक्त्याकडून आणि तेवढीच कर्मचार्‍यांकडून केली जाईल. अशा प्रकारे ईपीएफचे योगदान २४ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत येईल.

मात्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचार्‍यांना मोठ्या पगाराचा लाभ मिळणार आहे. परंतु परिणामी त्यांना दुहेरी झटका बसू शकतो. ईपीएफ योगदानाच्या कपातीचा परिणाम त्यांच्या निवृत्ती फंडावरच होणार नाही तर वाढीव पगारावरील कर दायित्त्व देखील वाढेल.

अधिक कर दायित्व टाळण्यासाठी त्यांना इतर गुंतवणूकीचे पर्याय शोधावे लागतील. सरकारचा हा निर्णय केंद्रीय कर्मचार्‍यांना लागू नाही.

तीन महिन्यांपर्यंत मिळणार वाढलेले वेतन
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना तीन महिने अधिक पगार मिळणार आहे. समजा बेसिक पगार आणि महागाई भत्ता मिळून तुमचे मासिक वेतन ५०,००० आहे. आता नव्या घोषणेनंतर हा पगार दरमहा १ हजार रुपयांनी वाढून ५१,००० रुपये होईल, जो तुमच्या बेसिक पगाराचा आणि महागाई भत्त्याच्या दोन टक्के असेल.

१. सेवानिवृत्ती निधीवर मोठा परिणाम
५०,००० मासिक पगारावर तुमचे ईपीएफ योगदान ६,००० रुपये (१२ टक्के) आहे आणि तेवढीच रक्कम नियोक्ता देखील जमा करतो. अशाप्रकारे दरमहा १२,००० रुपये जमा होते, आता दोन टक्के कपातीसह ही रक्कम १०,००० रुपये झाली. अशात तीन महिन्यांनंतर त्यात ६,००० रुपयांची घट झाली आहे, त्याचा परिणाम कर्मचार्‍याच्या सेवानिवृत्ती फंडावर होईल. यामुळे २० वर्षांत ३०,६७२,२८ रुपये, २५ वर्षात ४६,१२०,५७ रुपये आणि ३० वर्षांत ६९,३४९,५१ रुपये खर्च होतील.

२. सूट कमी झाल्यास कर देय वाढेल
प्राप्तिकर अधिनियम-१९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत ईपीएफ योगदानात सूट देण्यात आली आहे. पण, आता गुंतवणूकीचे इतर पर्याय शोधावे लागतील. समजा ५०,००० रुपये मासिक वेतनावर जुन्या पर्यायासह तीन महिन्यांचे तुमचे ईपीएफ योगदान १८,००० रुपये आहे. उच्च टॅक्स ब्रॅकेटमध्ये आल्यावर ५,४०० चा डिडक्शन क्लेम करू शकता. मात्र, कपातीनंतर ईपीएफचे योगदान कमी होऊन १५,००० रुपयांवर आल्यावर डिडक्शन क्लेमची रक्कमही कमी होऊन ४,५०० रुपयांवर येईल. यात ३००० च्या अतिरिक्त उत्पन्नावरील कर वाचवण्यासाठी गुंतवणूक देखील वाढवावी लागेल.

भरपाईसाठी व्हीपीएफमध्ये योगदान वाढवा
नुकसान भरपाईसाठी व्हीपीएफचे योगदान वाढवा, जेणेकरुन गुंतवणूक आणि डिडक्शन कमी होणार नाही किंवा आरोग्य विमा खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे आधीच आरोग्य विमा असेल तर त्याचा सुपर टॉप-अप घ्या, ज्यामुळे व्याप्ती देखील वाढेल. कर वाचवण्यासाठी आवश्यकतेनुसार ईएलएसएस, पीपीएफ किंवा एनएमसीमध्येही गुंतवणूक करू शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like