तुमच्या मुलांना दुधाची अ‍ॅलर्जी तर नाही ना ! वेळीच लक्ष द्या..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दूधात पोषक तत्व असल्याने मुलांच्या काळजीपोटी पालक आपल्या मुलांना दूध पिण्याचा नेहमीच आग्रह करतात. कधी-कधी तरी दूध पिण्यासाठी मुलांना जबरदस्तीही केली जाते. मुलांन दुधामुळे उलटी येत असली तरी दूध पिण्यास दिले जाते. परंतु, अशी जबरदस्ती मुलांसाठी त्रासदायक ठरू शकते. यासाठी दूध प्यायल्यास मुलांना त्रास होत असल्यास त्याची खातरजमा केली पाहिजे. दूध पिण्याचे टाळण्यासाठी मुले खोटी कारणे सांगत आहेत, असा समज करून घेऊ नये.

बऱ्याचदा मुलांना दूध प्यायल्यानंतर उलटी होते, घशामध्ये जळजळ होते, असे सांगतात. मात्र, पालकांना हा मुलांचा बहाणा वाटतो. अनेकदा ही लक्षणे मिल्क अ‍ॅलर्जीची असू शकतात. मिल्क अ‍ॅलर्जीचा संबंध लॅक्टोज इन्टॉलरेन्सशी जोडला जातो. लॅक्टोज इन्टॉलरन्सची समस्या ही शरीरामध्ये लॅक्टोज नावाच्या एंजाइमची कमतरता असताना होत असते. ज्यामुळे शरीरामध्ये लॅक्टोज आल्यानंतर एन्जाइम्स तोडू शकत नाहीत. लॅक्टोज दूधामध्येही असते. दूधामध्ये असलेले प्रोटीन हे मिल्क अ‍ॅलर्जीचे मुख्य कारण असते. याच्या सेवनाने शरीरामध्ये रोगांशी लढण्याच्या तंत्राशी प्रतिक्रिया देतात. ज्यामुळे व्यक्तीला त्रास होऊ लागतो.

उलटी होणे, पचवक्रियेच्या समस्या, पित्त होणे, ओठ किंवा चेहऱ्याच्या आजूबाजूला खाज येणे, त्वचा लाल होणे, चेहऱ्यावर सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ही दुधाच्या अ‍ॅलर्जीची प्रमुख लक्षणे असून डोळ्यांमध्ये पाणी येणे, नाक वाहणे, डोकेदुखी, गिळताना त्रास होणे, पोटाच्या समस्या हे अन्य लक्षणे आहेत. मुल दूध प्यायल्यानंतर या लक्षणांबाबत सांगत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. डॉक्टरां च्या सल्ल्यानुसारच मुलांवर उपचार करा. शिवाय अशावेळी मुलांना दूध देण्याचे टाळले पाहिजे. मिल्क अ‍ॅलर्जीवरील उपचार दीर्घकाळ चालतात. अनेक प्रकरणांमध्ये पीडित व्यक्तीची आयुष्यभर या अ‍ॅलर्जीपासून सुटका होत नाही. अ‍ॅलर्जी झाली असेल तर मुलांना गाय, बकरी, म्हैस सोया दूध देऊ नये. दूधापासून तयार केलेले पदार्थही देऊ नये.