Coronavirus : जाणून घ्या काय आहे ‘Triple ‘T’ फॉर्म्युला, ज्यामुळं दक्षिण कोरियानं लावला ‘कोरोना’ व्हायरसवर ‘ब्रेक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसची दहशत असून कोणताही देश याच्या तावडीतून सुटलेला नाही. संयुक्त राष्ट्र संघाचे १९२ सदस्य देश आहेत आणि दोन देश त्याचे निरीक्षक आहेत. तेव्हा कोरोना व्हायरस पसरलेल्या देशांबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, त्यांची संख्या 200 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर संपूर्ण जगात ७२२१९६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या व्हायरसमुळे ३३९७६ लोकांचा मृत्यू झाला असून १५१७६६ रूग्ण बरेही झाले आहेत.

दक्षिण कोरियाबाबत सांगायचे झाले तर तिकडेही ९६६१ लोकं अजूनही या व्हायरसने संक्रमित आहेत. मागच्या २४ तासात तिथे ७८ नवीन प्रकरणे आढळली आहेत. पण ज्या वेगाने तिथे प्रकरणे समोर आली होती त्या हिशोबाने दक्षिण कोरियाने त्यांच्याकडे खूप प्रयत्न करून यावर नियंत्रण ठेवले आहे.

तेथील वाढती संख्या पाहता सरकारने ट्रिपल टी फॉर्म्युल्यावर काम केले. यात पहिले रुग्णाची ओळख मग त्याची तपासणी आणि मग उपचार असे होते. इंग्लिशमध्ये सांगायचे झाले तर Trace-Test-Treat म्हटले जाते. तिथे सर्वात पहिले याचे प्रकरण २० जानेवारीला समोर आले होते. एका महिलेची तपासणी केल्यावर तिला संक्रमण झाल्याचे आढळले होते. ही महिला काही काळापूर्वीच वुहानमधून आली होती. पण यानंतर तिथे वेगाने या व्हायरसच्या संक्रमणाचे प्रमाण वाढले होते.

वुहानहून परत आलेल्या महिलेने या चर्चच्या प्रार्थना सभेत हजेरी लावली होती. यानंतर येथे असलेले अनेक लोकं याच्या संक्रमणात आले. ही बाब उघडकीस येताच आणि रुग्णाच्या जागेची माहिती होताच प्रशासनाला प्रथम या चर्चमधील दोन लाख सदस्यांची यादी मिळवली. नंतर त्या दिवशी व्यक्ती चर्चमध्ये गेली असेल अथवा नसेल तरी सर्वांची तपासणी केली गेली. यावेळी सर्वांना क्वारंटाइन केले गेले आणि या तपासणीनंतर जे संक्रमित आढळले त्यांच्यावर पूर्ण उपचार करण्यात आले. यावर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून क्वारंटाइनचे काटेकोरपणे पालन केले. देशात यासाठी नवीन नियम बनवण्यात आले होते आणि हे नियम मोडल्यामुळे दंडाची रक्कम दोन लाखांवरून सात लाखांपर्यंत वाढवण्यात आली. शिक्षा म्हणून नव्या नियमामध्ये एक वर्षाची शिक्षादेखील देण्यात आली. ट्रिपल टी फॉर्म्युलामुळे दक्षिण कोरियामध्ये या विषाणूच्या रूग्णांची संख्या वाढण्याला रोख लावण्यात सरकारला मदत झाली.

नंतर इटलीच्या ‘व्हो’ शहरात हा फॉर्म्युला वापरून पाहिला आणि तिथेही हा फॉर्म्युला फार प्रभावी ठरला. कोरोनाला रोखण्यासाठी तिथे ९७ टक्के लोकांची पहिले टेस्ट केली गेली आणि नंतर संक्रमित आढळल्यावर त्यांच्यावर पूर्ण उपचार केले गेले. यादरम्यान स्थानिक प्रशासनाने कठोरपणे लोकांना क्वारंटाइनचे पालन करण्याचे आदेश दिले होते. यादरम्यान प्रशासन पूर्णपणे शिथिल झाले.