‘ओम नम: शिवाय’ किंवा ‘ओम’चं उच्चारण केल्यानंतर होतात ‘हे’ 5 अद्भूत आरोग्यदायी फायदे ! जाणून घ्या कधी अन् कुठं करावा ‘जप’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुम्हाला माहित आहे का ओम या शब्दाचा योग्य प्रकारे जप किंवा उच्चार केल्यास आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. याशिवाय तुम्ही ताणतणावापासूनही दूर राहता. जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती.

‘या’ ठिकाणी करा ओमचा उच्चार

ओमचा उच्चार हा कधीही गर्दीच्या ठिकाणी करू नका. शांत ठिकाणी आणि एकाग्रतेनं करा. विशेष म्हणजे आजूबाजूच्या वातावरणामुळं तुमच लक्ष विचलित होता कामा नये. अशी स्थिती असेल तर तेव्हाच ओमचा जप करावा. तुम्ही ओम किंवा ओम नम: शिवाय हा मंत्रही म्हणू शकता. जे देवाची भक्ती करतात त्यांची भक्तीही होते आणि त्यांना आरोग्यदायी फायदेही मिळतात.

ओमचा उच्चार केल्यानं आपल्याला अनेक आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे होतोत. ते कोणते आहेत हे जाणून घेऊयात.

1) मनाला शांती मिळते – ओमचा उच्चार केल्यानंतर सकारात्मक भावना जागृत होते. यामुळं तुम्ही नकारात्मक विचार करणं आपोआपच टाळता. आत्म्याला शांती मिळते असं अनेक योगा आणि मेडिटेशनच्या गुरूंनीही सांगितलं आहे.

2) पचनशक्ती मजबूत होते – याच्या उच्चारामुळं अनेक पोटाचे विकार दूर होतात. तुमचं आरोग्य उत्तम राहतं. पचनक्रिया चांगली राहते.

3) झोपेची समस्या दूर होते – ज्यांना रात्री झोप न येण्याचा त्रास होतो त्यांनी सकाळी ओमचा जप करावा किंवा ओमचा मंत्र म्हणावा. यामुळं त्यांची समस्या दूर होईल.

4) ताण-तणाव दूर होतो – जेव्हा तुम्ही ओमचा जप करता तेव्हा डोक्यातून राग, भीती अशा भावना दूर होतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. सकाळी लवकर उठून जप केल्यास दिवस चांगला जातो. सकाळी शक्य नसेल तर रात्री जप करावा.

5) एकाग्रता वाढते – यामुळं तणाव दूर होतो आणि मन शांत राहतं. याची पुष्टी विज्ञानानंही केली आहे. यामुळं एकग्रता वाढते. परंतु याचा उच्चार करताना आवाज मोठा असावा तर याचा जास्त लाभ मिळतो.