प्रयत्न करूनही ‘वजन’ कमी होत नाही ? ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा, ‘मायक्रोबायोम’ असू शकते कारण !

पोलीसनामा ऑनलाइन – वजन नियंत्रणात ठेवणे किती आवश्यक आहे, ते वाढल्याने कोणकोणते गंभीर आजार होऊ शकतात, हे आता बहुतांश लोकांना समजू लागले आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी मॉर्निंग वॉक करतात, जीमला जातात, डाएटींग करतात, औषधं घेतात, पण काहीवेळा ऐवढे करूनही वजन कमी होत नाही. अशावेळी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणे खुप आवश्यक आहे. कारण यापाठीमागे विविध कारणे असू शकतात. ही कारणं जाणून घेतली तरच आपल्याला आपल्या चूका समजू शकतात. यापैकी सर्वात मोठे कारण मायक्रोबायोम असू शकते. जाणून घेवूयात याबाबत सविस्तर माहिती…

हे आहे कारण

* खाण्यापिण्याची काळजी घेऊन सुद्धा वजन कमी होत नाही. याचे कारण मायक्रोबायोम असू शकते.

* मायक्रोबायोम शरिरातील बॅक्टिरीया आणि वायरस यांना एकत्र करते. आतड्यांमध्ये लाखो बॅक्टिरीया असतात.

* मायक्रोबायोम कधीही स्थिर नसतो. सतत बदलत असतो. मायक्रोबायोममुळे शरीरात चांगले आणि वाईट बदल होत असतात.

* यामुळे वाढत जाणार्‍या बदलाने लठ्ठपणा, डायबिटीस, अंगाला सूज येणे यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. पोटातील बॅक्टीरीया आतड्यांना प्रभावित करतात.

* झोपायची चुकिची पध्दत आणि पोटातील अस्वस्थता यामुळे ताण- तणाव आणि डिप्रेशनचे प्रमाण वाढते. यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवते.

अशी घ्या काळजी

1 आहारात राईचे तेल वापरा. आतडयांची सूज कमी होते.

2 अँटीबायोटिक्स आणि गोळ्या टाळा.

3 कमी फॅट्स असलेल्या पदार्थांचे खा.

4 तळलेले पदार्थ खाऊ नका.

5 साखर आणि कार्ब्स असलेले पदार्थ टाळा.

6 फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा.

7 आहारात जास्तीत जास्त भाज्या खा.