‘वजन’ वाढण्याची ’ही’ 6 कारणे जाणून घ्या, भविष्यातील ‘धोका’ टाळा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणा हा अनेक आजारांना निमंत्रण देणारा असतो. चुकीच्या सवयी हे याचे प्रमुख कारण आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच अयोग्य आहार यामुळे लठ्ठपणा किंवा वजन वाढण्याचा धोका असतो. एकदा लठ्ठपणा वाढला की, रक्तदाब, हृदयरोग, मुधमेह असे आजार अगदी सहजपणे तुमच्या शरीरात प्रवेश करतात. वजन का वाढते, याची कारणे समजून घेतली तर हा धोका सहज टाळता येऊ शकतो. अनेकदा वजन कमी करण्यासाठी लोक विविध प्रयत्न करतात, पण वजन कमी होत नाही, यामागे काही कारणे आहेत. चुकीच्या पद्धतीने आणि तज्ज्ञांचा सल्ला न घेता वजन कमी करण्यसाठी निघालात तर तुम्हाला अपयश येऊ शकते. म्हणूनच याची कारणे जाणून घेवूयात.

वजन वाढण्याची कारणे

1 फोनचा अतिवापर
मोबाईलफोनच्या अतिवापराने शरीरातील सक्रियता कमी होऊन वजन वाढू लागते. या सवयीमुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. आहारातील पोषण योग्य प्रमाणात मिळत नाही, परिणामी वजन वाढते.

2 जेवण न करणे
वजन कमी करण्यासाठी किंवा बारीक होण्यासाठी जेवण सोडण्याचा विचार कधीही करू नका. यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होते. जेवण आणि नाश्ता वेळच्यावेळी घ्या. मात्र, खाताना जास्त फॅट्स असणारे किंवा गोड पदार्थ टाळा.

3 व्हिटामीन डी ची कमतरता
व्हिटामीन डी ची कमतरता असल्यास वजन वाढतं. यासाठी कोवळ्या उन्हात उभे राहा.

4 व्यायामाचा अभाव
व्यायामाच्या अभावाने वजन वाढते. यासाठी दररोज व्यायाम करा.

5 आहाराचे संतुलन
कार्बोहायड्रेट्स कमी करायचे आणि प्रोटिन्स वाढवायचे असे करू नका. वजन कमी करायचं असेल तर चरबी घटली पाहिजे. आणि ते प्रोटीन्स, कार्ब्स आणि चांगले फॅट्स यांच्या संतुलनातूनच होते.

6 जागरण
उशीरापर्यंत काम केल्याने किंवा जागरण केल्यान वजन कमी करण्यास अडथळा येतो. कॅलरी बर्न न होता फॅट्स अधिक वाढते. यासाठी लवकरात लवकर झोपा. यामुळे व्यायामाचा चांगला प्रभाव शरीरावर दिसून येईल. रोज आठ तासांची झोप आवश्य घ्या.