खोटं बोलण्याची सवय आताच सोडा, नाहीतर तुमच्या व्यक्तिमत्वावर होईल Negative Effect !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –    नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून (Study) खोटं बोलण्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला त्या काही काळासाठी फायदा होतो परंतु दीर्घकाळासाठी नुकसान सहन करावं लागतं. यामागे विज्ञान आहे. लोक मोठ्या प्रमाणात खोटं का बोलतात. तसेचं आपण खोट बोलण्यापासून स्वत:ला कसं वाचवू शकतो याबाबत माहिती घेणार आहोत.

माणूस खोटं का बोलतो ?

कोणत्याही प्रकारचा लाभ, जास्त फायदा, ताकद, पैसा, वस्तू आणि नोकरीत फायदा मिळवण्यासाठी व्यक्ती खोटं बोलत असतो. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन मधील (University College of London) संशोधकांना आढळून आलं आहे की, जेव्हा व्यक्ती खोटं बोलायला लागतो तेव्हा मेंदूमधील ऐमिग्डाल या भागात नकारात्मक भावना तयार होण्यास सुरुवात होते. त्याची लक्षणं दिसून येतात. मुलं जन्मापासून खोटं बोलत नाहीत. समाज आणि घरातील वडिलाधाऱ्यांकडून मुलं खोटं बोलायला शिकतात. ही नैसर्गिक गोष्ट नाही.

खोटं बोलणं किती घातक ?

संशोधकांना असं आढळून आलं आहे की, सुरुवातील जेव्हा तुम्ही खोटं बोलता तेव्हा तुमच्या मेंदूतील ऐमिग्डालमध्ये नकारात्मक भावना तयार होतात, त्या तुम्ही नेहमीच खोटं बोलायला लागले तर होत नाही. त्यामुळं खोटं बोलल्यामुळं तुमच्या मेंदूत केमिकल आणि सायकॉलॉजिकल बदल झाल्यानं याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर नक्कीच परिणाम होतो. मेदूतील ऐमिग्डाल या भागात भीती, चिंता, आणि आगतिक भावना तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळं जर आपण खोटं बोलत असू तर आपल्या मनात भीतीची आणि पश्चातापाची भावना निर्माण होते.

खरं बोलल्याचं विज्ञान

अनेकांना वाटतं की, खरं बोललं तर आपलं नुकसान होईल. परंतु या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि लोकांनीचा तसा गैरसमज पसरवला आहे. एका अभ्यासातून हे बरोबर नसल्याचं समोर आलं आहे. खरं बोलल्यानं तुम्हाला फायदा होतो आणि तुम्ही आनंदी राहू शकता. अनेक गोष्टीत हे सिद्ध झालं आहे. मग ते नातेसंबंध असो किंवा समाजिक ठिकाणं. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी (Honesty is the best policy) हीच एकच गोष्ट अनेक अभ्यासातून समोर आली आहे.

खोटं बोलण्यापासून सुटका होऊ शकते ?

तसं पाहिलं तर ही गोष्ट अशक्य नाही. यासाठी तुम्हाला मित्रांची आणि कुटुंबीयांची देखील मदत होऊ शकते. तुम्ही स्वत:लाच विचारून कधी खोटा बोलायचंय की नाही याचा निर्णय घेऊ शकता. खोटं बोलण्यापेक्षा खरं बोलणं जास्त सोपं आहे.

You might also like