शरीरातील विषारी घटक बाहेर न पडल्याने होतात ’या’ 11 गंभीर समस्या, ‘ही’ आहेत लक्षणं, जाणून घ्या

आपण दररोज जे अन्न सेवन करतो, त्या प्रक्रियेतून निर्माण होणारे अनेक विषारी घटक शरीरात असतात. या विषारी घटकांना टॉक्सिन्स असे म्हटले जाते. हे टॉक्सिन्स शरीरातून नियमित बाहेर पडणे आवश्यक असते. हे विषारी घटक लघवी वाटे बाहेर पडतात, यामध्ये किडनीचे कार्य खुप महत्वाचे असते. म्हणून किडन्या सुरळीत काम करत नसल्यास हे घटक तसेच राहतात आणि अनेक समस्या निर्माण होतात.

हे आहेत दुष्परिणाम

1 शरीरातील टॉक्सिन्स बाहेर न पडल्याने किडनीचे विकार होतात. किडनी डी व्हिटामीनचं रुपांतर इपीओ हार्मोनमध्ये करते. इपीओ हार्मोन शरीरातील लाल रक्तपेशीच्या वाढीवर नियंत्रण ठेवतात. यामुळे जर किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर शरीरातील लाल रक्तपेशीच्या तयार होण्यावर थेट परिणाम होतो.

2 रक्त दुषित होत जाते. यामुळे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते.

3 शरीरात पाण्याची कमरता भासते. शरीर कोरडे पडत जाते.

4 शरीरातील पाणी कमी झाल्याने हाडांचे आजार उद्भवतात.

5 जिभेच्या चवीवर परिणाम होतो.

6 तोंडाचा वास येतो.

7 वजन प्रचंड कमी होत जातं.

8 श्वास घ्यायला त्रास हे देखील किडनी विकाराचं एक लक्षण आहे.

9 किडनीच्या विकारामुळे रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका देखील निर्माण होत असतो. चेहर्‍यावर पांढरे चट्टे, झोपताना थकवा, अशी लक्षणं दिसतात.

10 लघवीचा त्रास होणे, ताप येणे, अंगदुखी हे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे.

11 जास्त प्रमाणात गोळ्या घेतल्याने सुद्धा किडनीचे कार्य बिघडू शकते.