शरीरावर सूज आणि अंगदुखी आहेत गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत ! जाणून घ्या ‘लक्षणं’ अन् ‘उपाय’

पोलिसनामा ऑनलाईन – कामाची धावपळ आणि कुटुंबाची जबाबदारी यामुळं महिलांना स्वत:कडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. परिणामी त्यांना अनेक आजारांना बळी पडावं लागतं. अनेकदा धावपळीच्या नादात त्या त्यांना होणाऱ्या त्रासाकडे जास्त लक्ष देत नाहीत. परंतु अशा अनेक लहान त्रासांचं रूपांतर पुढे जाऊन मोठ्या आजारात होतं. आज आपण अशा काही आजारांबद्दल जाणू घेणार आहोत जे महिलांना मोठ्या प्रमाणात होतात. याची कारणं आणि लक्षणं काय असतात हेही आपण जाणून घेणार आहोत.

महिलांना त्यांच्या अवयवासंबंधित आजार होतात परंतु त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्यात गर्भाशयाचा कॅन्सर हा आजार तर सामान्य झाला आहे. याचं मुख्य कारण राहणीमान आणि खाण्या-पिण्याच्या सवयी हे असू शकतं. गर्भधारणेदरम्यानही महिलांच्या गर्भाशयाला सूज येत असते. 50 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांनाही अशी सूज येते. त्यावेळी मेनोपॉज जवळ आलेला असतो. मासिक पाळी बंद होण्याची समस्या उद्भवते तेव्हा पीसीओस (PCOS) ची समस्या जाणवते. त्यामुळं गर्भाशयाला सूज येण्याची शक्यता असते.

गर्भाशयाच्या आतल्या भागात जो एक थर जमा झालेला असतो त्याला एंडोमेट्रीयम असं म्हणतात. या आजारात एंडोमेट्रीयमचा हा थर वेगानं वाढत जातो. एंडोमेट्रीयल कॅन्सर हा जीवघेणा आहे. कारण यामुळं महिलांची आई होण्याची क्षमता कमी होत असते. महत्त्वाचं म्हणजे एंडोमेट्रीयल कॅन्सरमुळं जन्माला येणाऱ्या बाळालाही कॅन्सरचा धोका असू शकतो. जर तुम्हाला मासिक पाळी व्यतिरीक्त रक्तस्त्राव होत असेल किंवा योनीतून कसल्याही प्रकारचा स्त्राव होत असेल तर तुम्ही या लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये.

अनेकदा लाईफस्टाईलमध्ये झालेले बदलही अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरतात. अन्हेल्दी पदार्थ खाणं, शारीरिक हालचाल न करणं, ताण-तणाव यामुळं गर्भाशयाच्या भागात सूज येण्याची शक्यता असते. यामुळं मासिक पाळीदरम्यानही समस्या जाणवतात. यामुळं गर्भाशयाचे विविध आजारही होतात. त्याला गर्भाशय फाईब्रॉईड असं म्हणतात.

गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं –

– गर्भाशयाच्या आकारात झालेल्या बदलामुळं सूज येत असते.
– मासिक पाळी अनियमित होणं
– पोटात जास्त दुखणं तसेच ओटीपोटात वेदना होणं
– जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणं
– शरीर जड वाटणं
– शरीराच्या विविध भागात सूज येणं
– अंग पिवळं पडणं
– कमरेच्या आसपासच्या भागात जास्त चरबी जमा होणं

गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी उपाय

जर तुम्हाला अंग सुजल्यासारखं वाटत असेल तर अशा वेळी डॉक्टरांशी संपर्क साधा. अनेकदा घरगुती उपाय करूनही तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकता. नियमित व्यायाम केला तरीही तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते. यासाठी आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) अळशीच्या बिया – अळशीच्या बियांचा वापर केला तरीही आरोग्य चांगलं राहू शकतं. यासाठी तुम्ही दळलेल्या अळशीच्या बिया दुधात उकळून रात्री झोपायच्या आधी पिऊ शकता.

2) हळदीचं दूध -जर तुम्ही रोज रात्री झोपताना हळदीचं दूध पिलं तर गर्भाशयाच्या आजारांपासून तुम्ही दूर राहता.

3) लिंबाची पानं – गर्भाशय व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही लिंबाच्या पानांचाही वापर करू शकता. यासाठी लिंबाची पानं आणि सुंठ पाण्यात उकळून घ्या आणि त्याचा काढा तयार करा. दिवसातून एकदा या काढ्याचं सेवन करा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.