ताप, खोकला, घसा खवखवणं असू शकतात टॉन्सिल्सची लक्षणं ! करा ‘हे’ 3 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – जर तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला, ताप किंवा घसा खवखवणं अशा समस्या येत असतील तर ही टॉन्सिल्सची लक्षणं असू शकतात. त्यामुळं वेळीच काळजी घेणं खूप गरजेचं आहे. टॉन्सिलायटिस ही एक सामान्य समस्या आहे. वातावरणात बदल झाल्यानं ही समस्या उद्भवते. टॉन्सिलायटीस या आजारात घशात दोन्ही बाजूला सूज येते. तोंडातही वेदना होतात. ताप येतो. या कारणांमुळं इतर आजार होण्याचीही शक्यता असते. हानिकारक बॅक्टेरिया व्हायरसमुळं टॉन्सिलमध्ये इंफेक्शन होतं.

काय आहेत लक्षणं ?
घशात वेदना होणं
घास गिळताना त्रास होणं
तोंडाच्या खालचा भाग दुखणं
श्वासांमध्ये दुर्गंधं

काय उपाय करावेत ?
टॉन्सिल आपल्या शरीरात आधीपासूनच असतो. टॉन्सिल जिभेच्या मागच्या बाजूस असतो. जर काही कारणामुळं संक्रमण झालं असेल तर त्यात सूज येते आणि वेदना होतात. यापासून आराम मिळवण्यासाठी रोज सकाळी गरम पाण्यानं गुळण्या करा.

1) हळद – हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण असतात. टॉन्सिल्सच्या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही हळदीचा वापर करू शकता. यासाठी हळद, काळं मीठ, काळी मिरी पाण्यात उकळा. या पाण्यानं सलग 2-3 दिवस गुळण्या करा. हा उपाय केल्यास तुमची समस्या दूर होईल.

2) मध आणि दालचिनी – मधाचा शरीराला खूप फायदा होतो. यातील पोषक घटक हे बॅक्टेरियांना नष्ट करतात. घशात होणारी खवखव दूर करण्यासाठी मध आणि दालचिनी यांचा वापर केला जातो. दालचिनी पावडर आणि मध एकत्र करून याचं 3 वेळा सेवन करा. यामुळं टॉन्सिल्सची समस्या कमी होते.

3) हर्बल चहा – जर तुम्हाला टॉन्सिल्सची समस्या घरच्या घरीच दूर करायची असेल तर ग्रीन टीचाही यासाठी खूप फायदा होतो. त्यासाठी ग्रीन टी मध्ये लवंग आणि दालचिनी टाकून याचं सेवन करा. यामुळं घशातील बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होते. तुम्ही यात लवंग आणि दालचिनी यांच्या प्रमाणे आल्याचाही वापर करू शकता. त्यानेही तुम्हाला फायदा मिळेल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.