हाडांमधून आवाज येत असेल तर ‘या’ गंभीर आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या ‘लक्षणं’ आणि ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  अनेकदा उठताना किंवा बसताना तुमच्या हाडांमधून कट कट असा आवाज येतो. आजकाल ही समस्या 30 किंवा 40 च्या आत वय असणाऱ्यांना जाणवते. मेडिकलच्या भाषेत याला क्रेपिटस म्हणतात. हे ऑस्टियोअर्थरायटिसचं लक्षण असू शकतं. याकेड दुर्लक्ष न करता वेळीच काळजी घ्या. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात.

काय आहे ऑस्टियोअर्थरायटिस ?
हा गुडघ्याच्या गाठींमधील सर्वात कॉमन प्रकार आहे. साधारणपणे 50 वयानंतर ही समस्या जास्त जाणवते. हाडांचं दुखणं, हाडांमध्ये गॅप यामुळं हा त्रास होतो. महिलांमध्ये 40 वयानंतर मोनोपॉजची स्थिती येते. या काळातही ही समस्या जास्त जाणवते. जर कमी वयात हा त्रास होत असेल तर कॅल्शियमची कमतरता भासून तुम्हाला हा आजार होऊ शकतो. त्यामुळं वेळीच काळजी घ्या. आता आपण याची लक्षणं आणि उपाय याबद्दल माहिती घेऊयात.

लक्षणं-
– लिगामेंट्ससंबंधित आजार
– हाडं वाकडी होणं
– हाडांना सूज
– गुडघ्यांमध्ये दुखणं
– व्हिटॅमिन डीची कमतरता

उपाय –
– शरीरात कॅल्शियमचं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी दूध आणि अंड्याचं सेवन करा.
– सुजलेल्या भागांवर बर्फाच्या पाण्यानं शेका (गरम पाण्यानं शेकू नका)
– क्रिम लावून हलक्या हातानं मसाज करा.
– नियमित व्यायाम करा.
– सकाळचं कोवळं ऊन घ्या.