‘फोटो सेंन्सिटिव्हिटी’मुळे होतात ‘या’ 2 आरोग्य समस्या, वेळीच व्हा ‘सावध’

पोलीसनामा ऑनलाईन – कोणताही आजार अचानक तुमच्या शरीरात उद्भवत नाही. आरोग्य समस्या किंवा आजार उद्भवताना काही लक्षणांच्या माध्यमातून संकेत मिळतात. हे संकेत वेळीच ओळखता आले तर त्या आजारावर वेळीच उपचार करता येतो. यामुळे आजार दूर होऊ शकतो. काही वेळा संवेदनशील डोळ्यांवर लाइटचा प्रकाश पडताच डोकं किंवा डोळे दुखण्याची समस्या होऊ लागते. तसेच समोरच्या गोष्टी धुसर दिसू लागतात. यास लाइट सेंसिटिव्हिटी म्हणतात. या समस्येला वैद्यकीय भाषेत फोटो सेंन्सिटिव्हिटी किंवा फोटोफोबिया असे म्हणतात.

हे लक्षात ठेवा

1 कोरडे डोळे
डोळ्यात सतत ओलावा राहण्याची व्यवस्था निसर्गाने केली आहे. जर हा ओलावा नष्ट झाला तर प्रकाश बघताच डोकं दुखते. अशावेळी वेळीच सावध झाले पाहिजे. डोळे कोरडे झाल्यास व्यवस्थित दिसत नाही. डोळे प्रकाशाबाबत अति संवेदनशील सुद्धा होतात. डोळे कोरडे झाल्यास डोळे लाल होणे, वेदना होणे आणि अस्पष्ट दिसणे, ही लक्षणे दिसू लागतात.

2 मायग्रेन
लाइट सेन्सीटिव्हिटी मायग्रेनचे प्रमुख लक्षण आहे. जर एखाद्या व्यक्तीला मायग्रेनचा अटॅक आला तर त्याला प्रकाशाकडे बघण्यास त्रास होतो. अनेकांना डोक्यात जोरात वेदना होतात. मायग्रेनमध्ये बघण्याची क्षमताही प्रभावित होते.