घसा दुखतोय तर मग असू शकतो थायरॉईड कॅन्सरचा संकेत, जाणून घ्या ‘लक्षणं’ आणि ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  रोजच्या आयुष्यात जगताना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. तसेच काही समस्यांकडे वेळेतच लक्ष न दिल्यामुळे त्याचे रूपांतर मोठ्या आजारात होत. घश्यात सूज येणं, खाताना किंवा पित असताना अन्न गिळण्यासाठी त्रास होणं. अशा समस्यांना साधारण समजून अनेक वेळा दुर्लक्ष करत असतो. जर तुम्हाला ही समस्या सातत्याने निर्माण होत असेल तर कॅन्सरचं देखील लक्षण असू शकते. घशात थायरॉईड ग्रंथी असतात. त्यामधून शरीरासाठी आवश्यक असलेले हार्मोन्स रिलीज होत असतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईड कॅन्सर चा धोका अधिक जास्त असतो. आम्ही आज तुम्हाला थायरॉईड कॅन्सरच्या लक्षणाबद्दल सांगणार आहोत.

लक्षणं

१. घश्यात सूज येणे

२. घशाच्या खालच्या बाजूला वेदना होणे

३. घश्यात गाठ आल्याप्रमाणे आकार वाढणं

४. खाताना -पिताना त्रास होणं

५. मासिक पाळीच्या पूर्वी नेहमीप्रमाणे जास्त वेदना होणं

६. अशक्तपणा, सांधेदुखी

७. अचानक वजन वाढणं, वजन कमी होणं

ही समस्या ३० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना निर्माण होते. रेडिएशन थेरपीच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये थायरॉईड कॅन्सर वाढण्याचा धोका अधिक असतो. अल्ट्रासाउंड आणि थायरॉईड स्कॅनमार्फत थायरॉईड कॅन्सरची चाचणी केली जाते. या आजरा संदर्भात माहिती मिळताच ऑपरेशन मार्फत पूर्ण ग्रंथी काढून टाकली जाते. त्यानंतर जास्त वेळ न लावता रुग्णाची रेडियोएक्टिव्ह आयोडीन थेरेपी केली जाते. थायरॉईड कॅन्सरमध्ये किमोथेरपी किंवा रेडियोथेरपीचा काही प्रमाणात वापर केला जातो.

उपाय

१. साखर कमी प्रमाणात सेवन केली पाहिजे. शरीरात साखरेचं प्रमाण वाढवणाऱ्या इतर पदार्थांचं प्रमाण सुद्धा कमी करा.

२. आहारात प्रोटीन्सचे प्रमाण वाढवा. शरीरात प्रोटिन्स थायरॉईड हार्मोन्सला टिश्यूजपर्यंत पोहचवतात. खाण्यात प्रोटिनच प्रमाण वाढवल्यानं थायरॉइडची समस्या कमी होऊ शकते.

३. या आजरामुळे वजन वाढत. तेव्हा महिला फॅटयुक्त आहार खाणे सोडून देतात. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडलं जात. अशा वेळी शरीराची गरज पूर्ण करणारे फॅट घेणे आवश्यक असते. हे फॅट हेल्दी असतील याची काळजी घ्या.

४. मादक पदार्थांचे सेवन टाळा. आयर्न असलेल्या पदार्थाचा आहारात समावेश करा. या आजरात महिलांमध्ये विशेषतः आयर्नची कमी असते. अशा वेळी त्यांना आयर्नसोबत इतर पोषक पदार्थही मोठ्या प्रमाणात घ्यायला हवी. निरोगी शरीरासाठी संतुलित आहार घ्या.