घशातील वेदना असू शकतो ‘थायरॉईड’ कॅन्सरचा संकेत ! जाणून घ्या ‘लक्षणं’ अन् ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन – जर काही खाताना किंवा पिताना घशात त्रास होत असेल आणि घशात सूज असेल तर अनेकजण याकडं दुर्लक्ष करतात. परंतु हे कॅन्सरचंही लक्षण असू शकतं. घशात थायरॉईड ग्रंथी असतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉई़ड कॅन्सरचा धोका जास्त असतो. आज आपण थायरॉईड कॅन्सरची लक्षणं आणि त्यावर काही उपाय जाणून घेणार आहोत. खास करून महिलांनी याकडे लक्ष द्यायला हवं.

काय आहेत लक्षणं ?
घशात सूज येणं
घशाच्या खालच्या भागात वेदना होणं
घशात गाठ आल्याप्रमाणं आकार वाढणं.
काही खाताना किवा पिताना त्रास होणं
मासिक पाळीत नेहमीपेक्षा जास्त वेदना होणं
अशक्तपणा
सांधेदुखी
अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं

रेडिएशन थेरपीच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये थायरॉईड कॅन्सर वाढण्याचा धोका जास्त असतो. साधारण 30 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या उद्भवते. अल्ट्रासाऊंड आणि थायरॉईड स्कॅनमार्फत थायरॉईड कॅन्सरची चाचणी केली जाऊ शकते. याची माहिती मिळताच ऑपरेशन करून ही ग्रंथी काढली जाते. यानंतर वेळ न दवडता रुग्णाची रेडियोएक्टीव आयोडिन थरेपी केली जाते. थॉयरॉईड कॅन्सरमध्ये काही प्रमाणात किमोथेरपी आणि रेडियोथेरपीचा वापर केली जातो.

कोणते उपाय करावेत ?
1)
साखरेचं सेवन कमी करा. जे पदार्थ शरीरात साखरेचं प्रमाण वाढवतात अशा पदार्थांचंही सेवन मी करायला हवं.

2) आहारात प्रोटीनचं प्रमाण वाढवा. शरीरात प्रोटीन्स थायरॉईड हार्माोन्सला टिश्युपर्यंत पोहोचवतात. खाण्यात प्रोटीनचं प्रमाण जर वाढलं तर थायरॉईडची समस्या कमी होऊ शकते.

3) या आजारात वजन वाढल्यानं महिला फॅटयुक्त आहार घेणं सोडून देतात यामुळं शरीरात हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. अशा वेळी शरीराची गरज पूर्ण करणारे फॅट घेतले जाणंही गरजेचं असतं. यालाच हेल्द फॅट्स असंही म्हणतात.

4) मादक पदार्थांचं सेवन करू नका. या आजारात जास्त करून आयर्नची कमी भासत असते. म्हणून महिलांनी भरपूर प्रमाणात आयार्न असणाऱ्या पदार्थांचं सेवन करावं. निरोगी राहायचं असेल तर सर्वसमावेशक असा संतुलित आहार घेणं खूप गरजेचं असतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.