नाही तर यंदाची निवडणूक पारदर्शी आणि मुक्त वातावरणात झाली नाही : आझम खान

लखनऊ : वृत्तसंस्था – एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळणार असे दाखवले जात असताना विरोधक मात्र ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नाकी काय होणार हे येत्या २३ तारखेला स्पष्ट होईलच. मात्र तोपर्यंत आरोपांचा धुरळा असाच उडत राहणार.

त्यानंतर आता रामपूर लोकसभा मतदारसंघातून सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे आझम खान यांनी नवीन आरोप केला आहे. त्यांनी आरोप करताना म्हटले आहे कि, जर माझा तीन लाखांच्या मताधिक्याने विजय झाला नाही तर यंदाची निवडणूक पारदर्शी आणि मुक्त वातावरणात झाली नाही, यावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे आता त्यांच्या या विधानाने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार तसेच त्यांची खासगी वाहनांतून वाहतूक यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे म्हटले आहे. आझम खान हे जयाप्रदा यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मध्यंतरी प्रचारादरम्यान जयाप्रदा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आझम खान यांच्यावर दोनवेळा प्रचारबंदीही लादण्यात आली होती. जयाप्रदा या भाजपच्या तर आझम खान सपाच्या तिकिटावर उभे आहेत.

दरम्यान, या सगळ्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने विरोधकांचे ‘हे’आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे आता खरे काय आहे हे येत्या २३ तारखेलाच स्पष्ट होईल.