अक्षय तृतीया शुभमुहूर्तावेळी चुकूनही ‘ही’ कामे करू नये, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लोक दान करतात. सोने-चांदी खरेदी केले जाते. असे म्हटले जाते की, या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि घरात समृद्धी येते. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे.

हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्वपूर्ण आणि शुभ आहे. या दिवशी गृह प्रवेश, लग्न आदी शुभ कार्ये केली जातात. तसेच, अक्षय तृतीया १४ मे रोजी आहे तर या दिवशी देवी लक्ष्मी रागावू नये म्हणून, या दिवशी काय करु नये? हे जाणून घ्या.

१. स्नान केल्याशिवाय तुळशीची पाने तोडू नका –
अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. भगवान विष्णूला तुळशीची पाने अत्यंत प्रिय आहेत. या दिवशी स्नान न करता तुळशीची पाने तोडू नका. असे केल्याने देवी लक्ष्मी रागावते, अशी मान्यता आहे.

२. रागावू नका –
अक्षय तृतीयेच्या दिवशी उपवास ठेवणाऱ्यांनी रागापासून दूर राहावं. असे मानले जाते की, असे केल्याने उपासना यशस्वी होत नाही. या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका. अशाप्रकारच्या वाईट सवयी टाळणे.

३. रिकाम्या हाताने घरी जाऊ नका –
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या-चांदीने बनवलेले काहीतरी विकत घेतले पाहिजे. आपण सोने खरेदी करु शकत नसल्यास कोणतीही धातूची वस्तू खरेदी करा.

४. बांधकाम करु नये –
अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन घर खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, या दिवशी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करणे अशुभ मानले जाते.

५. अक्षय तृतीयेचे महत्त्व –
मान्यतेनुसार, या दिवशी प्रत्येक काम करण्यात तुम्हाला यश मिळेल. देवी पार्वतींनी स्वतः धर्मराजांना ही गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या होत्या, जी कोणी व्यक्ती अक्षय तृतीयेच्या दिवशी विधीवत भगवान विष्णू आणि देवी पार्वतीची पूजा करेल, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. नि:संतान लोकांना संतान प्राप्ती होते.

महत्वाची टीप : या सदरात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.