पोस्ट ऑफिसची विशेष योजना ! दर महिन्याला मिळणार 4950 रुपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिसने (Post Office) आता एक गुंतवणूकीप्रमाणे विशेष योजना आखली आहे. अशा योजना लोंकाना फायदा मिळवून देतात. तसेच पोस्टात गुंतवलेले पैसेसुद्धा सुरक्षित असतात. प्रथम बँक अशा योजना आखत होत आता त्याप्रमाणे पोस्टातही अशा अनेक योजना आहेत. ज्याद्वारे प्रति महिना ४९५० रुपये कमावू शकता.

दरम्यान, पोस्ट ऑफिसच्या इंडिया पोस्टच्या वेबसाईटनुसार मासिक उत्पन्न योजनेत ६.६ टक्के व्याज मिळते. या योजनेत ग्राहक किमान एक हजार रुपये जमा करू शकतात. तसेच ग्राहकांनी जर संयुक्त खात्याद्वारे त्यात गुंतवणूक केली असेल तर त्याला दुप्पट फायदा मिळू शकतो. तसेच पोस्ट ऑफिसच्या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्यामध्ये संयुक्त खात्याद्वारे ९ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे व्याज वार्षिक ६.६ टक्के दराने ५९,४०० रुपये मिळते. या अनुषंगाने आपल्या व्याजची मासिक रक्कम ४,९५० रुपये आपण प्रति महिना घेऊ शकता. ही फक्त व्याजाची रक्कम आहे, आपली मूळ रक्कम ही तशीच स्थिर असते.

पाच वर्षांच्या मुदतीनुसार ग्राहकाला ४,९५० रुपये मासिक व्याज मिळणार आहे. त्यावेळी आपण इच्छित असल्यास, आपण आपला मॅच्युरिटी कालावधीसुद्धा वाढवू शकता. या योजनेअंतर्गत आपण फक्त १००० रुपयांत खाते उघडू शकता. जर ग्राहकाने एखादे खाते उघडले तर जास्तीत जास्त ४.५ लाख रुपये जमा करू शकतील. जर संयुक्त खाते (Joint account) उघडले असतील तर जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करू शकतील.

खाते कोण उघडू शकते?

१८ वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती
जास्तीत जास्त ३ संयुक्त धारकांसह खाते उघडता येते.
१० वर्षांवरील मुलाच्या नावे खाते उघडले जाऊ शकते.
१० वर्षांखालील मुलासाठी पालक त्यांच्या नावावर खाते उघडू शकतात.

अटी पहा-

खाते उघडण्याची १ वर्षापूर्वीची ठेव काढू शकत नाही. दुसरे म्हणजे जर तुमची मुदत पूर्ण होण्यापूर्वी ३ ते ५ वर्षांदरम्यान पैसे काढल्यास तुमच्या प्रिन्सिपलच्या १ टक्के कपात केली जाणार आहे. त्याच वेळी कालावधी पूर्ण झाल्यावर आपली रक्कम म्हणजेच ५ वर्षे पूर्ण केल्यास आपण योजनेचे सर्व फायदे मिळवू शकता.