ridge gourd turai | जाणून घ्या दोडका खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, रोग प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास पडतं उपयोगी

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama online) – ridge gourd turai | दोडका ही एक हिरवी भाजी आहे. यात व्हिटॅमिन सी, ए, बी, कॅल्शियम, तांबे, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज इ. आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. दोडक्याची फळे, पाने, मुळे आणि बियाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्याचे सेवन रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासोबत वजन नियंत्रित करण्यास मदत करते.

1) हृदय निरोगी राहते
दोडक्यात असलेले पोटॅशियम घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. हे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते तसेच हृदयविकाराचा झटका आणि हृदया संबंधित समस्या कमी करते.

2) रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी, दररोजच्या आहारात दोडक्याचा समावेश करणे हा एक उत्तम पर्याय आहे. पौष्टिक आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्माने समृद्ध असलेला दोडका रोग प्रतिकारशक्ती वेगाने वाढविण्यात मदत करते.

 

3) मधुमेह नियंत्रित करते

दोडक्यामध्ये पेप्टाइड आणि एल्कलॉइड घटक आढळतात. ते मेटाबॉलिज्म वाढविण्यात मदत करतात. दोडक्याचे सेवन केल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत होते. म्हणूनच, मधुमेह रूग्णांनी आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे.

4) वजन नियंत्रित करेल
दोडक्यामध्ये कमी कॅलरी आणि फायबर जास्त असते. ते घेतल्याने पोट बर्‍याच वेळ भरलेले राहते अशाप्रकारे, वजन वाढण्याच्या समस्येपासून आपल्याला आराम मिळतो.

5) यकृत डिटोक्स
दोडक्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने यकृत डिटॉक्स करण्यात फायदेशीर आहे.
यामुळे शरीरात असलेली घाण बाहेर येते.
अनेक आजारांचा धोका अनेक पटींनी कमी होतो.

6) डोळ्यांसाठी फायदेशीर
व्हिटॅमिन ए, बी, सी आणि इतर पौष्टिक द्रव्याने समृद्ध दोडका डोळ्यांची दृष्टी वाढविण्यास मदत करतो.
याच्या सेवनाने डोळ्यांची दृष्टी वाढते आणि त्या संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

Web Title :- know the health benefits of ridge gourd turai

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

India Coronavirus Cases | देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 41 हजार नवे रूग्ण; आतापर्यंत 37 कोटी 60 लाख लोकांना देण्यात आली व्हॅक्सीन

कोरोनाच्या संसर्गात वाढ ! जागतिक आरोग्य संघटनेने दिले तिसऱ्या लाटेचे संकेत