ATM कार्ड हरवले आहे ? चिंता करू नका ; ‘या’ २ मार्गांनी तात्काळ मिळेल ‘नवीन’ कार्ड

पोलिसनामा ऑनलाईन टीम : सध्याच्या डिजिटल टेकनॉलॉजि च्या जमान्यात एटीएम कार्ड ने आपले जीवन सुखकर केले आहे. डेबिट कार्ड हि आपल्यासाठी अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे. जेवण मागवायचे असो किंवा चित्रपटाचे तिकीट बुक करायचे असो अनेक कामे एटीएम कार्डमुळे घरबसल्या करता येतात. अशात जर आपले कार्ड हरवले तर मात्र मोठी गैरसोय होते आणि अनेक कामे अडतात. सर्वात महत्वाचे म्हणजे कार्डचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्यास तात्काळ बंद करने गरजेचे असते. दुसरे म्हणजे रोजची कामे अडत असल्याने तात्काळ कार्ड मिळविणे गरजेचे असते. कार्ड परत मिळविण्याची पद्धत मात्र अत्यंत सोपी आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआय ने ग्राहकांना कार्ड मिळविण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहक वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप, हेल्पलाईन नंबर इत्यादी च्या माध्यमातून नवीन एटीएम कार्ड साठी विनंती करू शकतात. कॉल किंवा ई-मेल च्या माध्यमातून सुद्धा कार्ड साठी विनंती करता येवू शकते. नवीन कार्ड मिळविण्यासाठी १०० रुपये इतका चार्ज आकारला जातो.

वेबसाइट च्या माध्यमातून अर्ज करण्याची पद्धत:
-सर्वात आधी sbicard.com वर लॉगिन करावे.
-Request वर क्लिक करावे.
-त्यानंतर Replace/Reissue card वर क्लिक करावे
-आता कार्ड नंबर टाकून Submit करावे.

मोबाइल अ‍ॅप च्या माध्यमातून अशी करावी विनंती :
-sbicard मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करावे.
– आता डाव्या बाजूला Menu Tab वर क्लिक करावे.
-त्यानंतर Replace/Reissue card वर क्लिक करावे
-आता कार्ड नंबर टाकून Submit करावे.

यानंतर आपले कार्ड चालू करण्यासाठी sbicard.com वर लॉगिन करू शकता किंवा बँकेला sbicard.com/email येथून ई-मेल च्या माध्यमातून विनंती करू शकता किंवा स्टेट बँकेच्या मोफत हेल्पलाइन क्रमांक १८६० १८० १२९० वर किंवा ३९ ०२ ०२ ०२ (STD कोड सहित) या नंबर वर कॉल करू शकता.

आरोग्य विषयक वृत्त –

रोमान्सचा मूड वाढविण्यासाठी अवश्य खावेत ‘हे’ १० सुपरफूड

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय

‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे