कुंडलीत ‘या’ घरामध्ये ‘शनि’ असेल तर तुमच्या आनंदाला लागणार ‘ग्रह’ण, जाणून घ्या ‘हे’ 5 उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कुंडलीतील शनीबाबत मनात नेहमीच एक प्रकारची भिती असते. कारण शनीचा दोष असल्यास व्यक्तीला जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यामुळे त्यास एक क्रुर ग्रह मानले जाते. हा तुळ राशीत उच्च तर मेष राशीत खालचा असतो. जाणून घेवूया कुंडलीत शनी दोष कसा तयार होतो आणि तो दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात कोणते उपाय आहेत.

एखाद्या व्यक्तीवर शनीची वक्रदृष्टी पडल्यास त्या व्यक्तीच्या जीवनात समस्यांची रांग लागते. त्याची चाल संथ असल्याने जातकाच्या जीवनावर त्याचा दिर्घ परिणाम दिसून येतो. जातकावर शुभ-अशुभ कोणता परिणाम होणार हे जन्म कुंडलीतील शनीच्या स्थानावरून ठरते. कारण जर कुडलीत शनीचे स्थान शुभ नसेल तर तो जातकाच्या कुंडलीत शनी दोष निर्माण करतो, जो व्यक्तीसाठी त्रासदायक ठरतो. कुंडलीतील चौथे स्थान ज्यास सुख स्थान म्हणतात यामध्ये शनीचे असणे चांगले मानले जात नाही. म्हणजे येथे शनीच्या उपस्थितीमुळे व्यक्तीच्या सुखांना ग्रहण लागते.

शनीची राहु आणि मंगळासोबत युती असेल तर अपघाताचा प्रचंड दुर्योग बनतो. अशा स्थितीत जातकाने वाहन चालवताना, रस्त्याने चालताना सावध राहिले पाहिजे. शनी सूर्यासोबत असल्यास कुंडलीत दोष निर्माण होतो. या दोषामुळे वडील आणि मुलाचे संबंध बिघडतात. दोघांमध्ये मतभेद होतात. शनि देव हे सूर्य देवाचे पुत्र आहेत आणि दोघांमध्ये शत्रुत्व भाव आहे. शनीचा वृश्चिक राशी किंवा चंद्राशी संबंध झाल्यास कुंडलीत विष योग निर्माण होतो. या दोषामुळे व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रात अयशस्वी होते. शनी जर तुमच्या मेष या खालच्या राशीत असेल तर जातकाला नकारात्मक फळ प्राप्त होते.

शनिवारच्या दिवशी करा शनी दोषापासून वाचण्याचा उपाय
1. प्रत्येक शनिवारी शनी देवाचा उपवास करा.
2. सायंकाळी पिंपळाच्या वृक्षाखाली जल अर्पण करा आणि तेलाचा दिवा लावा.
3. शनीचा मंत्र ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः, चा 108 वेळा जप करा.
4. काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करा.
5. भिकार्‍यांना अन्न-वस्त्र दान करा.