Dry Eyes Syndrome : ओळखा ‘ड्राय आय सिंड्रोम’ची लक्षणे आणि जाणून घ्या या पासून बचाव करण्याचे उपाय

नवी दिल्ली : लॅपटॉप, मोबाइल, टीव्ही सारख्या वस्तू दिर्घकाळ वापरल्याने सध्या ड्राय आय सिंड्रोम ही समस्या वाढली आहे. जर डोळ्यांना मोठ्या कालावधीसाठी ओलावा मिळाला नाही, तर त्यांच्यात खाज आणि पाणी येण्याची समस्या सुरू होते. यास ड्राय आय सिंड्रोम म्हणतात. हार्मोन्समध्ये बदल झाल्याने महिलांना ही समस्या जास्त होते.

ही आहेत लक्षणे
जळजळ, खाज, भुरकटपणा, डोळे चोळण्याची गरज भासणे, डोळ्यातून पाणी येणे. ही समस्या वाढली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

ही आहेत कारणे

1. जास्तवेळ लॅपटॉप, मोबाइलचा वापर.

2. कॉन्टॅक्ट जास्त काळा वापरणे.

3. एयरकंडीशनमध्ये जास्तवेळ बसणे.

4. प्रदूषणाचे कारण.

5. वेदनाशामक, उच्च रक्तदाब आणि इतर औषधांचे सेवन.

6. सूज किंवा विकिरणाने आश्रू, ग्रंथींचे झालेले नुकसान, ज्यामुळे आश्रुंची निर्मिती कमी होते.

7. व्हिटॅमिन ए ची कमतरता.

8. वृद्धत्वामुळे.

9. मरूमांच्या उपचारासाठी वापरली जाणारी आयसोट्रेटीनियोन औषधे.

10. सिस्टेमेटिक कंडीशन जसे की, स्जोग्रेन सिंड्रोम, रूमेटाइड अर्थरायटिस.

हे आहेत उपाय

– जास्तवेळ कम्प्युटर, स्मार्टफोनचा वापर टाळा. जास्तवेळ टीव्ही पहाणे टाळा. डोळ्यांना थेट हवा लागू देऊ नका. प्रदूषण आणि उन्हात चष्मा वापरा.

– जास्त वेळ कम्प्युटरवर काम करत असाल तर अधूनमधून काम बंद करून डोळ्यात गुलाबजल टाका आणि थंड पाण्याने डोळे धुवा.

– आहारात सर्व पोषक तत्वांचा समावेश करा.

– व्यायाम करा. धूम्रपान, अल्कोहल सेवन टाळा. तणाव टाळा. पोटॅशियमची कमतरता असल्यास डोळे कोरडे होतात. यासाठी गव्हाचे तृण, बदाम, केळे, बेदाणे, अंजीर आणि एवाकाडो सेवन करा.