‘स्वाक्षरी’मध्ये फक्त प्रारंभिक (initials) लिहिणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव गुण, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कोणताही व्यक्ती सही करताना साधारणपणे तीन प्रारंभिक (initials) वापरतो, एक स्वतःचा, दोन वडिलांचा/ नवऱ्याचा, तीन आडनावाचा, तर आज आपण जाणून घेणार आहोत की, फक्त प्रारंभिक (initials) लिहिणाऱ्या व्यक्ती कशा असतात.

* समजा एखाद्या व्यक्तीचे नाव सुरेश आहे आणि तो सहीमध्ये फक्त ‘S’ लिहितोय आणि बाकी काहीच लिहीत नाही, याचा अर्थ असा होतो त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात फार त्याग (SACRIFICE) केलेला आहे आणि याचाच दुसरा अर्थ असा होतो की, त्या व्यक्तीवर त्याच्या आई- वडिलांचा प्रभाव कमी आहे, स्वतःची ओळख वेगळी अशी निर्माण करायची असते.

* एखाद्या व्यक्तीच्या सहीमध्ये वडिलांचा initial लिहीत असेल ,फक्त वडिलांचाच initial असणारी सही सहसा नसते, स्वतःच्या initial सोबत वडिलांचा initial असेल तर याचा अर्थ असा होतो की, त्या व्यक्तीने आपल्या वडिलांना आयुष्यात फार मेहनत करताना बघितले आहे आणि त्याच्या वडिलांनी आयुष्यात फार sacrifice केलं आहे. सहसा आजच्या पिढीमध्ये सहीमध्ये वडिलांचे नाव किंवा initial लिहिणारी व्यक्ती खूप कमी प्रमाणात आहेत. हा नियम (principle), विवाहित स्त्रीच्या बाबतीत तिच्या नवऱ्याचा initial ला पण सारखाच लागू पडतो .
क्वचितच जर असं आढळलं की, एखाद्या सहीमध्ये स्वतःच्या initial नाही आणि वडिलांचा initial आणि आडनाव आहे याचा अर्थ असा होतो, तो व्यक्ती स्वतःबद्दल लपवतो.

* जर एखादा व्यक्ती आपल्या आडनावाचाच intial लिहीत असेल आणि पूर्ण आडनाव लिहीत नसेल, तर याचा अर्थ असा होतो की, तो व्यक्ती आपल्या व्यवसाया(profession) बद्दल काहीतरी लपवतोय किंवा त्याला त्याबद्दल सांगणं आवडत नाही.

* जर एखाद्या व्यक्तीच्या सहीमध्ये फक्त initials असतील, स्वतः च्या नावाचे वडिलांच्या नावाचे आणि आडनावाचे तर अशी व्यक्ती स्वतःबद्दलचे सगळे पत्ते झाकून ठेवतात आणि शेवटच्या क्षणाला निर्णय घेतात.

तुमचे सहीबद्दल /लोगोबद्दल असणाऱ्या प्रश्नांचे आम्ही स्वागत करतो. असे सर्व प्रश्न नवनीत क्रिएशन (NAVNEET CREATION) च्या फेसबुक पेजवर किंवा YOUTUBE चॅनेलवर कमेंटमध्ये विचारावेत, ही विनंती.

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (86051 12233)

क्रमशः