Sushant Singh Rajput Death : सुशांतची हत्या झाली का ? पोलीस, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेंसिक तज्ञ अहवाल काय सांगतो ?

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. काहींनी म्हटलं की, त्याला आत्महत्येसाठी भाग पाडलं आहे. तर काहींनी म्हटलं की, हा खून आहे. पोलीस, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेंसिक तज्ञ अहवालानुसार सगळ्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे आपण जाणून घेऊयात.

काय सांगतो शवविच्छेदन अहवाल ?

सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट सांगितलंय की, गुदमरल्यामुळं त्याचा मृत्यू झाला आहे. आत्महत्येत गुदमरून मृत्यू होत असतो. गळा दाबून मारणं किंवा कोणतीही झटापट झाल्याचा उल्लेख या अहवालात नाही. त्यामुळं सुशांतची हत्या झाल्याचा जो दावा केला जात आहे खोटा आहे.

खोलीत स्टुल का नव्हता ?

सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट आहेत ज्या म्हटलंय की, सुशांतनं आत्महत्या केली तिथं स्टुल का नव्हता. सूत्रांनी अशी माहिती दिलीय की, फॅनपर्यंत पोहोचण्यासाठी सुशांतच्या बेडची आणि त्याची उंचीच पुरेशी होती. मुळातच तो उंच असल्यानं त्याला कशाची गरज पडली नाही.

मेडिकल आणि फॉरेंसिक तज्ञांच्या मते…

मेडिकल आणि फॉरेंसिक तज्ञांच्या मते, आतापर्यंत अशा अनेक केसेस अशा समोर आल्या आहेत ज्यात ज्याचा आधार घेऊन फाशी घेतली जाते त्यात आणि मृतकाच्या पायांमध्ये खूप कमी अंतर असतं. सुशांतच्या बाबतीतही असंच काहीसं झालं असावं असं म्हटलं जात आहे.

दरवाजा बाहेरून बंद होता ?

अनेकांनी असा दावा केला होता की, सुशांतच्या खोलीचा दरवाजा हा आतून बंद होता. परंतु पोलिसांनी चावी तयार करणाऱ्याचा जबाब नोंदवला आहे. चावी तयार करणाऱ्यानं सांगितलं आहे की, दरवाजा बाहेरून नाही तर आतून बंद होता. याशिवाय त्याच्या दरवाजाच्या लॉकसोबतही कुठली छेडछाड करण्यात आली नव्हती. तूर्तास तरी पोलिसांचं म्हणणं आहे की, हीआत्महत्या आहे. तरी पोलीस तपासात सत्य काय ते समोर येणारच आहे.

मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. व्यावसायिक शुत्रुत्व, नैराश्य, खासगी आयुष्य या सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत.