नियमित चालण्यानं होतात ‘हे’ 13 आश्चर्यकारक फायदे ! जाणून घ्या वयानुसार व्यक्तीनं किती चालायला हवं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर आपण नियमित व्यायाम केला तर निरोगी राहतो आणि शरीरही मजबूत होतं. सतत आजारी पडण्याचं प्रमाणही कमी होतं. जर तुम्हाला व्यायाम करणं शक्य नसेल तर किमान रोज चालण्याचा व्यायाम तरी करावा. चालणं हा सर्वात सोपा उपाय आहे. याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. हे फायदे माहित असूनही लोक चालणं टाळतात. परंतु हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. यासाठी तुम्हाला वेगळं असं काही करावं लागत नाही. रोज तुम्ही 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम करत असाल तर इतर कोणता व्यायाम करण्याची गरज पडत नाही. आज आपण चालण्याचे काय फायदे होतात याबद्द माहिती घेणार आहोत.

नियमितपणे चालण्याचे फायदे –

1) हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होतो.
2) पचनक्रिया सुधारते
3) मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
4) एकाग्रतेसाठी आणि चिंतनासाठीही चालण्याचा खूप फायदा होतो.
5) पाठीचे दुखणे, हृदयरोग, मुधमेह, उच्च रक्तदाब आणि श्वासांच्या त्रासावर नियंत्रण मिळतं.
6) रोज चालण्यामुळं मेंदूलाही खूप फायदा होतो. तुमचा ताणतणावही कमी होतो.
7) मुड फ्रेश राहण्यास मदत होते.
8) डिमेंशन आणि अल्जायमर असे आजार उद्भवत नाहीत.
9) फुप्फुसांना वेगळी हवा पोहोचल्यानं ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो. फुप्फुसांचे आजार होत नाहीत आणि त्याची कार्यक्षमताही वाढते.
10) शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
11) सृजनशीलतेला चालना मिळते.
12) एकाच वेळी शारीरिक आणि मानसिक व्यायाम होतो.
13) पचनक्रिया चांगली राहते.

दररोज नेमकं किती चालावं ?

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज किमान अर्धा तास चालायला हवं. 10 हजार पावलं म्हणजेच 6-7 किमी रोज चालणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. चालण्यामुळं शरीराला ऊर्जा प्राप्त होते. प्रमाणापेक्षा जास्त चालण्याचीही गरज नाही. कारण असं केल्यास थकवा जाणवू शकतो.

कोणत्या वयोगटातील व्यक्तीनं किती चालावं ?

1) 6 ते 17 वयोगटातील व्यक्तींनी 15 हजार पावलं चालावं.
2) 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांनी 12 हजार पावलं चालावीत.
3) 50 वर्षे वयोगटातील लोकांनी 10 हजार पावलं चालावीत.
4) 60 वर्षे वयोगटातील लोकांनी रोज 8 हजार पावलं चालायला हवीत.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.