भारतात कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात, जगाच्या इतर प्रमुख 19 देशांमध्ये एवढा आहे ‘कर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताला भेडसावणाऱ्या मंदीवर मात करण्यासाठी आज कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी घोषणा केली. कंपन्यांना भराव्या लागणाऱ्या करामध्ये म्हणजेच कॉर्पोरेट टॅक्समध्ये चांगलीच कपात करण्यात आली आहे. करकपातीचा निर्णय गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला.

देशातील उत्पादन कंपन्यांना आता सर्व अधिभारांसहीत 25.17 टक्के कर द्यावा लागणार आहे. याव्यतिरिक्त कंपन्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. तसंच देशातील कंपन्यांवार लागणारा MAT देखील न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कॅपिटल गेनवर लागणारा सरचार्जही आता आकारण्यात येणार नाही.

कोणत्या देशात किती आहे दर ?
देश – दर (टक्केवारीत)
अमेरिका – 27
इंग्लंड – 19
युएई – 55
फ्रान्स – 31
रशिया – 20
साऊदी अरब – 20
जपान – 30.62
आयर्लंडमध्ये कॉर्पोरेट -12.50
कॅनडा – 26.50
डेन्मार्क – 22
ऑस्ट्रेलिया – 25
अर्जेंटीना -30
जर्मनी – 30

शेजारी देशातील कॉर्पोरेट दर
पाकिस्तान – 30
अफगाणिस्तान – 20
बांग्लादेश – 25
श्रीलंका – 28
म्यानमार – 25

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like