‘या’ आजाराने पीडित लोक ‘काल्पनिक’ विश्वात जगतात , जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

पोलीसनामा ऑनलाइन – आधुनिक काळात लोक तणावात जास्त राहू लागले आहेत. हा तणाव हळूहळू वाढत जातो, जो सिजोफ्रेनियाचे रूप धारण करतो. या आजारात व्यक्तीची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती नष्ट होऊ लागते. हा एक असा काळ असतो, ज्यामध्ये व्यक्तीची अतिशय कठीण परीक्षा असते. मानसिक आणि शरीरिक दृष्ट्या तुम्ही किती मजबूत आहात, हे यातून समजते. सिजोफ्रेनिया आजार कसा आहे, त्याची लक्षणे आणि उपचार याविषयी आपण जाणून घेवूयात…

कसा आहे सिजोफ्रेनिया
सिजोफ्रेनिया एक मानसिक रोग आहे. या आजारात व्यक्ती कोणत्याही गोष्टीला समजून घेण्यास सक्षम नसतो. तो एका अशा जगात जगू लागतो, जेथे केवळ अंधार असतो. तो अजब हालचाली करू लागतो. तो कुणाशी तरी बोलत असतो, पण सोबत कुणीच नसते. त्यास चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागतात. यासोबतच व्यक्ती हळूहळू कमी बोलू लागतो आणि स्वताला समाज आणि कुटुंबापासून दूर ठेवू लागतो. हा एक रोग असून त्यावर उपचार शक्य आहेत. जर वेळीच उपचार केले नाहीत, तर व्यक्ती धोकादायक ठरू शकतो.

सिजोफ्रेनियाचे उपचार
जर एखाद्या व्यक्तीमध्ये सिजोफ्रेनियाची लक्षणे आढळली तर, त्यास ताबडतोब डॉक्टरकडे दाखवले पाहिजे. प्राथमिक स्तरावर यावर सहज उपचार करता येतात. तर शेवटच्या स्टेजमध्ये सिजोफ्रेनियाच्या रूग्णाला कठिण उपचारांतून जावे लागते. यामध्ये रूग्णाला हॉस्पीटलमध्ये दाखल करावे लागते. तसेच शॉक ट्रीटमेंटसुद्धा घ्यावी लागते. यामुळे व्यक्ती कमजोर होऊ शकते. सिजोफ्रेनिया ग्रस्त व्यक्तीसाठी ताबडतोब सायकॅट्रिस्टचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही उपचार करू नयेत.