काय असते ‘सरोगेसी’ ज्यामुळे शिल्पा शेट्टी झाली दुसऱ्यांदा आई ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी सरोगेसीनं दुसऱ्यांदा आई झाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी तिनं एका मुलीला जन्म दिला. 21 फेब्रुवारी रोजी शिल्पानं मुलीच्या हातासोबतचा एक फोटो शेअर केला आणि ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली होती. बॉलिवूडमधील अनेक कपल सरोगेसीनं आई-वडिल बनले आहेत. या यादीत शाहरुख खान, आमिर खान, करण जोहर, एकता कपूर, तुषार कपूर असे स्टार्स आहेत. जाणून घेऊयात सरोगेसी म्हणजे काय ?

काय आहे सरोगेसी ?
सरोगेसीमध्ये विवाहित कपल मुलाला जन्म देण्यासाठी एखाद्या महिलेचा गर्भ भाड्यानं घेऊ शकतात. सरोगेसीनं मूल जन्माला घालण्यामागे अनेक कारणं आहेत. जसं की, मूल जन्माला घालण्यात काही अडचण असणं, महिलेच्या जीवाला धोका असणं किंवा मग एखाद्या महिलेला स्वत:लाच मूल जन्माला घालायचं नसतं.

जी महिला आपल्या गर्भात दुसऱ्याचं मूल वाढवते तिला सरोगेट मदर म्हणतात. सरोगेसीमध्ये महिला आणि मूल हवं असणाऱ्या कपलमध्ये अ‍ॅग्रीमेंट केलं जातं. यानुसार ज्यांनी सरोगेसी केली आहे तेच या मुलाचे कायदेशीर आई-वडिल असतात. सरोगेट मदरला प्रेग्नंसी दरम्यान आपली काळजी घेण्यासाठी, मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी पैसेही दिले जातात. सरोगेसीचे दोन प्रकार असतात.

1) ट्रॅडिशनल सरोगेसी-
या सरोगेसीमध्ये होणाऱ्या बापाचे स्पर्म सरोगेट महिलेच्या एग्जसोबत मॅच केले जातात. या सरोगेसीत जेनेटीक संबंध फक्त बापाशी असतो.

2) जेस्टेशनल सरोगेसी-
या सरोगेसीमध्ये होणाऱ्या आई-वडिलांचे स्पर्म आणि एग्ज यांचं टेस्ट ट्युबमध्ये मिलन केल्यानंतर ते सरोगेट मदरच्या युट्रसमध्ये रोपण केलं जातं.

सरोगेसीचे दुरुपयोग पाहून भारतात याबद्दल अनेक नियम करण्यात आले आहेत.