‘या’ वयात आई झाल्यास मुलं जन्मतात ‘हुशार’ ; रिसर्चमधून खुलासा

मुंबई : वृत्तसंस्था – प्रत्येक स्त्रीला आई होण्याची आस असते. तिच्या आयुष्याचे सार्थक आई होण्यातच आहे अशी तिची कल्पना असते. मात्र आई होण्याचं योग्य वय असतं. लग्न झाल्यानंतर काहीजण फॅमीली प्लॅनिंग करतात. परंतु वयाचा विचार कुणी करताना दिसत नाही. पण डेन्मार्कमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमधून महिलांना आई होण्याचे योग्य वय सांगण्यात आले आहे. रिसर्चनुसार योग्य वयात आई झाल्यास त्यांच बाळ अधिक हुशार होतं.

रिसर्चनुसार आई होण्याचे योग्य वय हे ३० वर्ष असल्याचे सांगितले आहे. या वयात आई झाल्यास यूट्रसच्या कॅन्सरचा धोका कमी असतो. हे वय महिलांना बाळाला जन्म देण्यास योग्य असते तसेच त्या पूर्णपणे सेटल झालेल्या असतात. त्यामुळे आईला बाळाला जन्म देण्याचे हेच योग्य वय असल्याचे रिसर्चमध्ये म्हटले आहे.

रिसर्चनुसार, बाळाला जन्म देताना आई फिट असेल तर जन्माला येणारे बाळही फिट आणि हुशार जन्माला येते. बाळाला जन्म देताना आईचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले असणे गरजचे आहे. जर आईचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले नसेल तर त्याचा परिणाम बाळावर पडू शकतो.

डेन्मार्कमधील आरहूस विश्वविद्यालयात हा रिसर्च करण्यात आला असून ४ हजार ७४१ महिलांचा रिसर्चमध्ये समावेश करण्यात आला होता. डेन्मार्कमध्ये बाळाला जन्म देण्याचे आईचे सरासरी वय ३०.५ आहे. याचप्रमाणे इंग्लंड आणि वेल्समध्येही आईचे वय ३० आहे. या वर्षापर्यंत महिला बाळाला जन्म देण्यासाठी परिपक्व होतात. तसचे शिक्षण आणि आर्थिक रुपायने त्या स्वतंत्र होतात. त्यामुळे या वयात आई झाल्यास मुलाचे संगोपन करण्यास तिला कोणतीही अडचण येत नाही.