कमी पाणी पिल्यानं तुमच्या शरीरावर पडतो ‘वाईट’ परिणाम, होवु शकतात ‘हे’ आजार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – निरोगी राहण्यासाठी नेहमी एक सल्ला दिला जातो तो म्हणजे सारखं पाणी पीत राहण्याचा. आपल्या शरीरासाठी पाणी खूप महत्त्वाचं असतं. पाणी शरीरातील सगळी घाण बाहेर काढण्याचं काम करतं. प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर जैच बुश यांनी सांगितलं की, ‘पाणी एका डिटर्जंट सारखं काम करतं जे शरीरात सफाई करण्याचं काम करतं. शरीरातील प्रत्येक शिरा आणि नसांना काम करण्यासाठी पाणी महत्वाचं आहे.’ या तर जाणून घेऊ की पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरात कोणकोणत्या समस्या उद्भवतात. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता भासते तेव्हा केशिका मेंदूला संकेत देतात की तुम्हाला तहान लागली आहे. डिहायड्रेशनचा परिणाम मेंदूवर अन्य प्रकारे दवखील पडू शकतो. याचा संबंध मूड आणि परफॉर्मन्सशी जोडलेला असतो. अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनच्या सर्वेनुसार फक्त 2% डिहायड्रेशन देखील तुमचं लक्ष विचलित करू शकतं. डिहायड्रेशनचा परिणाम स्मरणशक्तीवर देखील होतो.

डिहायड्रेशनमुळे इलेक्ट्रोलाईटचे प्रमाण खूप कमी होते त्यामुळे त्याचा मेंदूवर विपरीत परिणाम होतो. इलेक्ट्रोलाईट पोटॅशियम आणि सोडियम मिनरल्स केशिकांच्या मध्ये सिग्नल पाठवण्याचे काम करतात. मेयो क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार,इलेक्ट्रोलाईट कमी झाले तर, केशिकांच्या मध्ये सिग्नल पोहचणार नाही त्यामुळे मांसपेशींमध्ये ताण पडू शकतो. जेव्हा शरीरात पाणी कमी पडते, तेव्हा केशिका हायपोथॅलेमसला एक संकेत पाठवतात ज्यातून वेसोप्रेसिन नावाचे हार्मोन स्रवते. याला अँटी डायरेकटिक नावानेही ओळखले जाते. हा हार्मोन किडनीला रक्तातून पाणी वेगळं करण्याचे संकेत देतो. डॉ बुश यांच्या मते, ‘आश्चरकारक म्हणजे तुमची किडनी एका दिवसात 55 गॅलेन पर्यंत तरल पदार्थ वाहून नेण्यासाठी सक्षम आहे’.

जास्त वेळ पाणी नाही पिलं तर, किडनीवर ताण पडू शकतो. नॅशनल किडनी फाउंडेशनच्या मते, अशा प्रकारे किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. ज्या लोकांना जास्त घाम येतो, आणि जे लोक गरम शुष्क प्रदेशात राहतात त्यांना अशा प्रकारच्या समस्या येतात. शरीरात रक्त तयार होण्यासाठी स्निग्ध पदार्थ महत्वाचे असतात. स्निग्ध पदार्थ कमी पडले तर रक्ताची देखील कमतरता जाणवते. शरिरात योग्य ब्लड प्रेशरसाठी स्निग्ध पदार्थ महत्वाचे असतात. शरीरात ब्लड कमी असेल तर ती व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते. युएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनच्या नुसार, डिहायड्रेशनमुळे हायपोवोल्मिक शॉक सारखी समस्या उदभवू शकते. डॉक्टर बुश यांनी सांगितले की, शरीरात रक्त कमी असेल, आणि पाण्याची कमी असेल तर डोकं दुखणे, चक्कर, डोळ्यांवर ताण अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

पचन संस्था सुरळीत राहण्यासाठी पाण्याची गरज असते. पाण्याच्या मदतीने अपचन झालेले पदार्थ शरीरातून बाहेर पडतात, आणि पचन संस्था सुरळीत राहते. शरीरात स्निग्ध पदार्थ कमी पडले तर त्याचा परिणाम शौचावर होतो. पाण्याच्या कमतरतेमुळे त्याचा परिणाम स्किनवर देखील होतो. शरीरात पाणी कमी पडले तर स्किन कोरडी पडते. चांगल्या आणि निरोगी स्किनसाठी हायड्रेशन चांगलं असणं गरजेचं आहे.