रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रक्तदानामुळे आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो. म्हणूनच रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे म्हटले जाते. परंतु, काही लोकांमध्ये रक्तदानाबाबत अजूनही गैरसमज असल्याने त्यांच्यात जागृती करण्याची गरज भासते. उलट रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते. अशाप्रकारचे अनेक फायदे होतात. रक्तदान केल्याने मानसिक आरोग्यही चांगले राहते, असे तज्ज्ञ सांगतात.

रक्तदान कसे करावे, रक्तदान केल्यानंतर काय करावे, यांसारख्या गोष्टींबाबत अनेकजणांना माहिती नसल्याने रक्तदानाबाबत जनजागृतीची आजही गरज भासते. अनेक समाजसेवी संस्था, एनजीओ रक्तदानाबाबत जनजागृती करत आहेत. रक्तदाते निर्माण झाल्याशिवाय रक्त उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदाते पुढे आले येणे गरजेचे आहे. ऑस्ट्रीयाई जीवशास्त्रज्ञ कार्ल लेण्डस्टाइनर यांनी ब्लड ग्रुप निर्माण केले. भारतामध्ये दरवर्षी एक कोटी ब्लड युनिटची गरज असते. त्यामुळे शक्य असेल तेव्हा रक्तदान केले पहिजे. रक्तदान केल्याने हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होतो. रक्तदान करण्याआधी आणि केल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. रक्तदान करण्यापूर्वी हेल्थ चेकअप आणि ब्लड टेस्ट करून घ्यावी. त्यामुळे ब्लड हेल्दी आहे की नाही हे समजते. तुमच्या ब्लडमधील हिमोग्लोबीन कमीत कमी १२.५ टक्के असेण आवश्यक असते.

निरोगी आणि कोणतेही इन्फेक्शन अथवा संक्रमण न झालेल्या व्यक्ती रक्तदान करू शकतात. १८ ते २० वयाचे तरूणही रक्तदान करू शकतात. रक्तदान करण्यासाठी वजन कमीत कमी ५० किलो असावे. उच्च रक्तदाब, किडनी, डायबिटीस किंवा एपिलेप्सीसारखे आजार असणारे रक्तदान करू शकत नाहीत. ज्या महिलांचे मिस्कॅरेज झाले आहे, त्यांनी ६ महिन्यांपर्यंत रक्तदान करू नये. मागील एका महिन्यामध्ये कोणत्याही कारणासाठी लसीकरण केले असेल तर रक्तदान करू नये. मद्यसेवन केले असल्यास २४ तासांपर्यंत रक्तदान करू नये. रक्दान करणारांनी मुबलक प्रमाणात आयर्न असणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. मासे, बीन्स आणि पालक यांसारख्या पदार्थ आहारात घ्यावेत. रक्तदान केल्यामुळे शरीरामध्ये आयर्नची कमतरता होते. आयर्न शरीरातील विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते.

शरीरामध्ये आयर्नच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि चक्कर येते. याव्यतिरिक्त भरपूर प्रमाणात आहारात लिक्विडयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच रक्तदान करण्याच्या एक दिवस अगोदर भरपूर झोप आणि विश्रांती घ्या. आवळा, संत्री आणि लिंबू यांसारख्या व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आयर्न योग्य वेळी आणि पूर्णपणे शरीरामध्ये पोहोचू शकते. जंक फूड, आइस्क्रिम्स आणि चॉकलेट्स यांसारख्या पदार्थांपासून दूर रहावे. ब्लड कॅम्प किंवा हॉस्पिटलमध्ये जाणार असाल, तिथे रक्तदान करण्याआधी स्वच्छता आणि उपकरणांची स्वच्छता याकडे लक्ष द्यावे. रक्त घेण्यासाठी वापरण्यात येणारी सिरिंजही नवीन आहे याची खात्री करावी. रक्त घेताना डॉक्टर आणि स्टाफच्या हातांमध्ये ग्लव्स आहेत याची खात्री करावी.

रेड क्रॉस ब्लडनुसार, ज्या ठिकाणावरून रक्त घेण्यात आले आहे, त्याभागाला पाण्याच्या मदतीने व्यवस्थित स्वच्छ करावे. रक्तदान केल्यानंतर कमीत कमी अर्धा तास आराम करावा. जास्त धावपळ किंवा एक्सरसाइज करणे टाळावे. रक्तदान केल्यानंतर लगेच गाडी चालवू नये. फ्रुट ज्यूससारखे द्रवपदार्थ घ्यावेत. ज्यांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असेल. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य रहाते. रक्तदान केल्यानंतर ८ तासांपर्यंत मद्यसेवन करू नये.