… म्हणून उत्तर कोरियाचे तानाशाह किम जोंग ऊन 21 दिवसांसाठी झाले होते ‘गायब’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग याच्यासंदर्भात अनेक बातम्या समोर येतात, परंतु आता एक बातमी समोर येत आहे की, ज्यात म्हटले जात आहे की, किम जोंगची तब्येत ठीक नाही आहे. ज्यामुळे तो आपल्या उपचारावर लक्ष केंद्रित करत आहे. या कारणांमुळे त्याने गेल्या दोन महिन्यांपासून सामान्य लोकांपासून अंतर ठेवले आहे. एप्रिलमध्ये वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात त्याच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रकारच्या अफवांना ऊत आला होता, एप्रिलमध्ये तो तीन आठवड्यांपासून बेपत्ता होता. तोपर्यंत त्यांच्या मृत्यूविषयी अटकळ होती, पण 1 मे रोजी किमने कारखान्याच्या उद्घाटन सोहळ्यास हजेरी लावून सर्व अटकळ मोडीत काढली. दरम्यान, त्या कार्यक्रमानंतर किम पुन्हा कोणत्याही कार्यक्रमात दिसला नाही किंवा समोर येऊन जनतेला कोणता निरोपही दिला नाही. आता पुन्हा एकदा त्याच्या तब्येतीबद्दल चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामागील कारणे देखील सांगण्यात येत आहेत, जी अगदी योग्य असल्याचे दिसून येत आहे.

एका कोरियन तज्ञाच्या म्हणन्यानुसार किम जोंग यांच्याकडे आरोग्य हा एक मोठा मुद्दा आहे त्याला तो दाखवायचा नाही पण बर्‍याच गोष्टी पाहिल्यानंतर आता हे स्पष्ट झाले आहे, कारण गोष्टी त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. कोरिया युनिव्हर्सिटीमधील उत्तर कोरियन अभ्यासाचे प्राध्यापक नाम सेओंग-वूक यांनी सांगितले की, किम जोंग उनसाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये आता खुर्च्या आणि डेस्कची व्यवस्था केली जात आहे. हे देखील लक्षात आले आहे की किम जास्त काळ उभे राहण्यास असमर्थ आहे, त्याला जास्त अंतर चालणे शक्य नाही. यापूर्वी कार्यक्रमांमध्ये किमसाठी या गोष्टी ठेवल्या जात नसल्या तरी तो कार्यक्रमात भाग घ्यायचा. पण आता ते दिसत नाही. किमच्या शरीरात काही गोष्टी घडल्या ज्यामुळे तो जास्त काळ उभे राहू शकत नाही, थोड्या वेळासाठी उभे राहिल्यानंतर त्याला बसावे लागते. म्हणूनच कदाचित एप्रिल महिन्यात कुमसुसन पॅलेस येथे आयोजित वर्धापन दिन कार्यक्रमात तो हजर राहिला नाही, कारण जर त्याने त्या कार्यक्रमास हजेरी लावली असती तर त्याला तेथे किमान एक तास तरी उभे रहावे लागले असते. तो प्रोटोकॉलचा एक भाग होता.

त्याच्या कार्यक्रमातील अनुपस्थितीमुळे बरीच अटकळ सुरु होती. हि पहिली वेळ होती जेव्हा किमने या कार्यक्रमास हजेरी लावली नव्हती. उत्तर कोरियामध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, लोक त्याची वाट बघत असतात. असे असूनही, किमचा त्यात भाग न घेणे बर्‍याच गोष्टींचा विचार करण्यास भाग पाडत होते. मेमधील एका कार्यक्रमानंतर किम मागील 21 दिवसांपासून पुन्हा बेपत्ता आहे आणि आता उत्तर कोरियाचे राजकीय माध्यम पुन्हा एकदा देशासमोर सकारात्मक चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अशा काही गंभीर गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीस किमबद्दल एक चांगले चित्र सादर करण्याचा प्रयत्न केला गेला, असे सांगून किम जोंग देशासाठी 365 दिवस काम करतो, आणि कोणत्याही प्रकारची सुट्टी घेत नाही, अगदी रात्र- रात्रही तो काम करतो.

उत्तर कोरियामधील एका दैनिकात किम बद्दल एक लेख प्रकाशित केला आहे की, किम एक क्रांतिकारक नेता आहे, त्यांच्या दिनदर्शिकेत सुट्टी नाही, तो फक्त आणि फक्त कार्यरत राहतो. कोरियाच्या वर्कर्स पार्टीच्या सेंट्रल कमिटीच्या अधिकृत कागदावर संपूर्ण मुखपृष्ठ किम जोंग उन यांच्या कार्याला समर्पित केले गेले, ज्यात किमने 2012 पासून केलेल्या सर्व कार्याचे वर्णन केले. हे संपूर्ण पृष्ठ केवळ त्यालाच समर्पित केले होते. काही देशांनी राजधानी प्योंगयांगवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या नेत्याने त्यांना दिले त्याने उत्तर दिले की, तो कोणासमोर अशक्त होणार नाही.