देशात कोणतं Adhaar Card मान्य आहे, UIDAI नं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड (Adhar card) आणि त्यासंबंधी सर्व्हिस देणारी अधिकृत UIDAI ने मागील काही दिवसांपासून नव्या PVC आधार कार्डची घोषणा केली होती. यानंतर अनेकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले. नव्या PVC आधार कार्डमुळे जुनं आधार कार्ड मान्य असणार की नाही अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली. मात्र आता UIDAI ने ट्विट करत स्पष्ट केलं की, PVC आधार कार्ड जारी झाल्यानंतर, जुनं आधार कार्ड अमान्य होणार नाही. तसेच UIDAI ने देशातील तीन प्रकारचे आधार कार्ड मान्य राहणार असल्याची माहिती दिली आहे.

PVC आधार कार्ड
UIDAI ने काही दिवसांपूर्वी क्रेडिट आणि डेबिट कार्डसारखे दिसणारे आधार कार्ड जारी केले. हे आधार कार्ड जवळ बाळगण्यास सोपे आणि टिकाऊ आहे. तसेच दिसायला देखील आकर्षक आहे. कोणताही व्यक्ती हे पॅलिविनाइल क्लोराइड कार्ड (PVC) बनवू शकतो. हे कार्ड तयार करण्यासाठी केवळ 50 रुपये खर्च येतो. तसेच हे लेटेस्ट सिक्युरिटी फिचर्ससह आहे. याच्या सिक्युरिटी फिचर्समध्ये hologram, Guilloche Pattern, Ghost image आणि Microtext चा समावेश आहे. हे PVC कार्ड एक प्रकारचं प्लॅस्टिक कार्ड आहे. तसेच हे वॉटर प्रुफही आहे. UIDAI वेबसाईट uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in द्वारे ऑर्डर करता येणार आहे. हे आधार कार्ड स्पीड पोस्टाद्वारे घरी डिलिव्हरी होईल.

आधार लेटर
UIDAI कडून पोस्टाने पाठवण्यात येणारे आधार कार्डही मान्य आहे. अनेकदा पोस्टाद्वारे येणारं आधार कार्ड पोस्ट करण्यास उशीर झाल्याने ते ग्राहकांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे UIDAI कडून नागरिकांना आधार कार्डची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

e-Aadhaar
ई-आधार UIDAI च्या वेबसाईट वरुन डाऊनलोड करता येऊ शकतं. याची प्रिंट काढून कुठेही सरकारी ओळखपत्र म्हणून याचा वापर करता येऊ शकतो.

You might also like