देशात आणि जगात सर्वात महाग आणि स्वस्त शहरे कोणती ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईने परप्रांतीयांच्या राहणाच्या खर्चाच्या बाबत देशील सर्वात महागडे शहरांमध्ये म्हणून नाव नोंदवले आहे. मर्सरच्या 2020 ‘कॉस्ट ऑफ लिव्हिग सर्व्हे’ नुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक महागड्या शहरांपैकी एक शहर आहे. त्याचबरोबर मुंबई परप्रांतियांसाठी राहण्यासाठी जगातील 60 व्या क्रमांकाचे सर्वात महाग शहर आहे. तर आशियात मुंबई 19 व्या क्रमांकावर आहे. सर्वेक्षणानुसार मुंबई नंतर दिल्ली आणि चेन्नई देशातील सर्वात महागडी शहर आहेत. महागड्या शहरांच्या यादीत दिल्ली 101 व्या तर चेन्नई 143 व्या क्रमांकावर असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

या सर्वेक्षणानुसार बेंगळूरू (171) आणि कोलकता (185) ही क्रमवारीत सर्वात महागडी भारतीय शहरे आहेत. सर्व भारतीय शहरांच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, परप्रांतीयांसाठी महाग असलेल्या शहराच्या बाबतीत नवी दिल्लीने 17 क्रमांकाने वरचे स्थान प्राप्त केले आहे. तर सर्वात महागड्या 100 शहरांपैकी दिल्ली हे शहर 101 व्या स्थानावर आहे. परप्रांतियांसाठी सर्वात महागड्या शहरांच्या जागतिक यादीमध्ये हाँगकाँग अव्वल स्थानावर आहे. यानंतर अश्काबाद (तुर्कमेनिस्तान) दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत जपानच्या टोकियो आणि स्वित्झर्लंडचे झ्यूरिक हे चौथ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर सिंगापूर गेल्या वर्षापेक्षा दोन स्थानांनी खाली आले असून सिंगापूर पाचव्या स्थानी आहे.

जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा महागड्या शहरांपैकी अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर सहाव्या, चीनमधील शांघाय सातव्या, आठव्या स्थानी स्वित्झर्लंड मधील बर्न आणि नवव्या स्थानावर जेन्हेवा आणि दहाव्या स्थानावर बीजिंग शहराचा क्रमांक लागतो. दुसरीकडे जगातील सर्वात माहगाड्या शहरांचा विचार केला तर त्यात ट्युनिस (ट्युनिशिया), विन्डहोक (नामिबिया), ताश्कंद (उझबेकिस्तान), बिश्केक (किर्गिस्तान) आणि पाकिस्तानच्या कराची शहरांचा समावेश आहे.