पोलीसनामा ऑनलाईन टीम : किचनमध्ये कुकिंग ऑईलचे खुप महत्व असते. डाळीला तडका देण्यापासून भाजी बनवणे आणि डिप फ्रायपर्यंत सगळ्यासाठी तेलाचा वापर होतो. आरोग्याबाबत वाढत्या जागृततेमुळे लोक आपले कुकिंग ऑईल वारंवार बदलत असतात. काही संशोधनानुसार ऑलिव्ह ऑईल चांगले असते तर काहींच्या मते एवोकडो ऑईल चांगले असते. परंतु, तुमच्यासाठी कोणते आईल चांगले आहे तुम्हाला माहित आहे का ?
रिफाइंड ऑईल प्रत्येक किचनचा जरूरी घटक आहे. बहुतांश लोकांना वाटते की, रिफाइंड ऑईल आरोग्यासाठी लाभदायक आहे आणि यामध्येच सर्व पदार्थ बनवले जातात. परंतु रिफाइंड ऑई कुकिंगसाठी चांगले नाही आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगले नाही. रिफाइंड ऑईल बनवण्याच्या पद्धतीत ते खुप मोठ्या तापमानाचा वापर केला जातो. यामुळे त्याच्यातील पोषक घटक कमी होतात. रिफाइंड ऑईलमध्ये ट्रान्स फॅटसुद्धा असते जे शरीराला नुकसान पोहचवते.
रिफाइंड ऑईलपेक्षा चांगले कच्ची घानी तेल आहे. कच्ची घानी तेल बनविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तापमानाचा वापर केला जात नाही. यामुळे त्याच्यातील सर्व पोषक घटक कायम राहतात. मोहरीचे तेलसुद्धा चांगले अँटीबॅक्टेरियल मानले जाते आणि ते इम्यूनिटी वाढविण्याचे काम करते. यामध्ये तुम्ही भाजी बनविण्यापासून डीप फ्राइंगसुद्धा करू शकता.