‘बिग बी’ अमिताभनं ट्विट करत का दिल्या PM मोदींना शुभेच्छा ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी एखादं ट्विट केलं की, लगेचच ते व्हायरल होताना दिसत. अमिताभ यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केलं आहे जे व्हायरल होत आहे. यात त्यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बींनी पीएम मोदींना कशाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं कौतुक का केलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

बिग बींनी बुधवारी (दि 20 मे) भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आयुष्मान भारत स्किमच्या यशासाठी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कारण आयुष्मान भारत स्किमचा लाभ घेणाऱ्या लोकांची संख्या 1 कोटींच्या पुढे गेली आहे. बिग बींनी त्यांच्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केलं आहे.

बिग बी यांनी शेअर केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.

You might also like