… म्हणून डेबिट कार्ड वापरणार्‍यांची झपाटयानं घटतेय

बेंगळुरु : वृत्त संस्था – देशात एकीकडे कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असतना दुसरीकडे आलेला एक अहवाल आश्चर्यकारक आहे. मागील काही कालावधीपासून डेबिट कार्ड वापरणार्‍यांची संख्या घसरली आहे. यापाठीमागे मॅग्नेटिक स्ट्रिपवाले कार्ड चिपमध्ये बदलल्याचे कारण सांगितले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिजर्व्ह बँकेचा डाटा समोर आल्यानंतर समजले आहे की, ऑक्टोबर 2018 मधील डेबिट कार्ड्सची संख्या 99.8 करोडवरून 11 टक्के घसरून एप्रिल 2019 मध्ये 88.47 करोडवर आली आहे. या घसरणीमुळे डिजिटल पेमेन्टला प्रोत्साहन देणार्‍या सरकारच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.

बँकर्सचा अंदाज आहे की, सेंट्रल बँकेच्या आदेशाने मॅग्नेटिक स्ट्रिप असणारी कार्ड चिपमध्ये बदलल्याने असे झाले आहे. आतापर्यंत डेबिट कार्ड्समध्ये मॅग्नेटिक स्ट्रिपचा वापर केला जात होता, जी आता चिपमध्ये बदलण्यात आली आहेत. मॅग्नेटिक स्ट्रिपची कार्ड आता बंद केली आहेत.

कार्ड बदलल्यानंतर सुद्धा अजून असंख्य ग्राहकांपर्यंत नवे कार्ड पोहचलेले नाहीत. याशिवाय ग्रामीण भागात ज्यांचे डेबिट कार्ड बंद झाले, ते नवे कार्ड घेण्यासाठी अजूनपर्यंत गेलेले नाहीत. यामुळे डेबिट कार्ड ग्राहकांची संख्या घटली आहे. डेबिट कार्ड यूजर्सची संख्या कमी झाली असली तरी क्रेडिट कार्ड होल्डर्सची संख्या वाढली आहे.

You might also like