Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान ‘या’ राज्यातील सरकार दारूची दुकाने उघडण्याच्या तयारीत, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरही हरियाणा आणि हिमाचलमधील दारूची दुकाने खुली राहिली. परंतु टीकेनंतर राज्य सरकारने मोठ्या अडचणीने राज्यातील दारूची दुकाने बंद केली. दोन दिवसांपूर्वीच आसाम सरकारच्या आदेशानंतर राज्यात दारूची दुकाने उघडली गेली. तर केरळ सरकारने राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्यातील मद्यप्राशन करणार्‍यांना डॉक्टरांच्या निर्देशानुसार मद्य पुरवण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर केरळ राज्य सरकारने दारू ऑनलाईन देण्यास सहमती दर्शविली होती. यानंतर राज्यातील दारू दुकानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आणि काही तासातच दुकानांतून दारू संपली. यासह भाजपा शासित हरियाणामधील सरकारने दारू कारखान्यांना तयार राहण्याचा आदेश दिला. दरम्यान, देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान, सरकार दारूची दुकाने उघडण्याच्या तयारीत आहेत. वास्तविक, याचे सर्वात मोठे कारण म्हणेज महसूल. कारण राज्य सरकारांना मिळणाऱ्या महसुलाचा सर्वात मोठा वाटा दारूतून मिळतो.

दरम्यान, पेट्रोलियमप्रमाणेच अल्कोहोल हेही कमालीचे उत्पन्न देणारे उत्पादन आहे. ज्याला मोठी मागणी आहे, जरी किंमत वाढली आणि नंतर खाली आली, परंतु अल्कोहोलवर जास्त परिणाम होत नाही. त्याचबरोबर सरकारला चांगला महसूलही मिळतो. म्हणूनच राज्यांची विविध सरकार आता दारू विक्रीला परवानगी देण्याच्या पर्यायावर विचार करीत आहेत. ऑनलाईन तसेच दुकाने विक्री करण्याची राज्य सरकारची योजना आहे.

भारतात दरवर्षी अल्कोहोलची मागणी 8.8 टक्क्यांनी वाढत आहे. ज्यामध्ये अल्कोहोल आणि व्होडकाला जास्त मागणी आहे. त्याचबरोबर भारत जगात व्हिस्कीचा सर्वात मोठा ग्राहक देखील आहे. आकडेवारीनुसार 2010 ते 2017 या काळात देशात मद्याच्या विक्रीत 38% वाढ दिसून आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू सरकार दरवर्षी अल्कोहोलमधून 30 हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करते, तर हरियाणामध्ये अल्कोहोलमधून मिळणारा महसूल 19 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशमध्ये राज्य सरकारला दारूपासून 14 हजार रुपये महसूल मिळतो. तर पंजाबला दरवर्षी दारूपासून 5 हजार कोटी महसूल मिळतो. याशिवाय मद्यपानातून केरळ सरकारला सुमारे 14 हजार कोटींचा महसूलही मिळतो.