पुरुषांचं वाढत्या वयात टक्कल का पडतं ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेक पुरुषांना  टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना करवा लागतो. परंतु महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. रिसर्चनुसार, 70 टक्के पुरुष केसगळती आणि टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना करतात. महिलांमध्ये हे प्रमाण पाहिलं तर केवळ 40 टक्के इतकंच आहे. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये तर कमी वयातही मुलांना टक्कल किंवा जास्त केसगळतीचा सामना करावा लागत असल्याचं दिसत आहे.

टक्कल पडण्याचा पॅटर्न

पुरुषांच्या टक्कल पडण्याला एंड्रोजेनिक एलोपेसिया पॅटर्न बोल्डनेस असं म्हटलं जातं. या स्थितीत केस फोरहेड म्हणजेच कपाळापासून वर गळणं सुरू होतं आणि नंतर क्राऊन एरिया म्हणजे डोक्याच्या मध्यभागात केसगळती होते.

पुरुषांच्या टक्कल पडण्याचं कारण काय ?

पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जेनेटीक्स आणि डी हायड्रो टेस्टोस्टेरॉन नावाचं मेल सेक्स हार्मोन्स हे आहे. रिसर्चनुसार, प्युबर्टीदरम्यान मसल्स आणि हेड टिश्यू म्हणजे डोक्यातील पेशी स्ट्रेच होतात. या दरम्यान डी हायड्रो टेस्टोस्टेरॉन सुद्धा मुलांच्या शरीरात जास्त रिलीज होऊ लागतात.

फॉलिकल्सला नाही मिळत पोषण

डी हायड्रो टेस्टोस्टेरॉन जेव्हा जास्त रिलीज होतं तेव्हा हेअर फॉलिकल्समधील एंड्रोजन रिसेप्टर्स जे केसांना हेल्दी ठेवण्यासाठी शरीरातून पोषण घेतात ते हार्मोन्स जास्त रिलीज होतात. हार्मोन्सचं प्रमाण जास्त झालं की, फॉलिकल्स आकुंचन पावतात, ज्यामुळं ते केसांना पूरक पोषक घेऊ शकत नाहीत आणि कमजोर होतात. हेच कारण आहे की, केसगळती होऊ लागते.

… आणि कायमस्वरूपी टक्कल पडतो

जर या हार्मोन्सचं प्रमाण कायम राहिलं तर नवीन केसही येत नाहीत आणि शरीर फॉलिकल्स स्पेस बंद करतं. असं होतं तेव्हा कायमस्वरूपी टक्कल पडू शकतो. पुरुषांमध्ये या हार्मोन्सची निर्मिती आयुष्यभर सुरूच असते. हेच कारण आहे की, ते केस गळती आणि टक्कल पडणं अशा समस्यांचे शिकार होतात.

सर्व परुषांचं का नाही पडत टक्कल ?

जर काही पुरुषांना टक्कल पडत नसेल तर याची दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे त्यांचे जेनेटीक्स आणि दुसरं म्हणजे त्यांच्यातील एंड्रोजन रिसेप्टर्स हार्मोन्सला कमी प्रमाणात शोषून घेतात.

वयाच्या पन्नाशीनंतर वाढतं टक्कल

एका रिसर्चनुसार, वयाच्या पस्तीशीपर्यंत 2 तृतीयांश पुरुषांनी टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना केल्याचं मान्य केलं. 50 आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या 80 टक्के पुरुषांनी केस पातळ होणं आणि टक्कल पडणं या गोष्टी मान्य केल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like