PF चे पैसे ‘सुरक्षित’ करायचे असतील तर नक्की ‘आधार’कार्डशी लिंक करा, जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत
नवी दिल्ली :वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नवीन सेवा सुरु केली आहे. याअंतर्गत तुमचे पीएफ खाते आधारकार्डला जोडणे बंधनकारक झाले आहे. EPFO ने एक ऑनलाईन सेवा आणली असून याद्वारे तुम्ही तुमचे पीएफ खाते आधारकार्डला सहजरित्या जोडू शकता.
PF अकाउंट आधाराला जोडण्याचे फायदे
या सुविधेमुळे पीएफ धारकांना त्यांच्या खात्यासंबंधी सर्व माहिती मिळत राहते.
जाणून घ्या पीएफ खात्याला आधारशी जोडण्याची प्रक्रिया
1) यासाठी सुरुवातीला www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगइन करावे लागेल.
2) यानंतर Online Services >> e-KYC Portal>> link UAN aadhar वर क्लिक करावे लागेल.
3) या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला UAN नंबर आणि UAN अकाउंटला रजिस्टर्ड मोबाइल नंबर अपलोड करावा लागेल.
4) यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. हा OTP टाकल्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या रकान्यात तुमचा 12 क्रमांक असलेला आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर प्रॉसिड टू ओटीपी व्हेरिफिकेशन हा पर्याय येईल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
5) यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला व्हेरीफिकेशनसाठी OTP जनरेट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या पीएफ खात्याला हा आधारक्रमांक जोडला जाईल.
Visit : Policenama.com
- तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी
- ‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका
- धुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती
- ‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी
- एकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके ! निर्माण होतात आरोग्य समस्या
- थोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय