‘या’ पेन्शन योजनेचे अनेक फायदे, 60 वर्षानंतर मिळणार ‘लाभच-लाभ’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतरिम अर्थसंकल्प 2018-19 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना (PM-SYM) जाहीर केली गेली. या योजनेपूर्वी लोकांना राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) उपलब्ध होती.

प्रधानमंत्री श्रम योगी समाज योजनेंतर्गत 60 वर्षानंतर 15,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या व्यक्तीला दरमहा किमान 3000 रुपये पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही पेन्शन मिळण्यासाठी कर्मचार्‍याला दरमहा ठराविक रकमेचे योगदान द्यावे लागेल आणि तेवढ्याच मूल्यांचे योगदान सरकारचे असेल.

कोणाला मिळू शकतो लाभ
प्रधान मंत्री श्रमयोगी मानधन पेंशन योजना असंघटित क्षेत्रातील कोणताही कामगार, ज्याचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असेल आणि कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसेल असाच व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतात. असंघटित क्षेत्राशी संबंधित कामगार, घरगुती कामगार, ड्रायव्हर, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, कचरा उचलणारे, बिडी कामगार या सर्व जणांना या योजनेचा फायदा घेता येतो.

प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार रुपये
ही योजना स्वीकारणाऱ्याला सरकार दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन देणार आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षा पेक्षा जास्त असू नये, तसेच व्यक्तीकडे आधार कार्ड आणि बँकेचे सेव्हिंग खाते असणे अनिवार्य आहे.

pension plan

जमा करावे लागतील 55 रुपये
जर कोणी ही योजना वयाच्या 18 व्या वर्षापासून सुरू केली तर त्यांना दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. त्याचबरोबर, ज्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर तुम्हाला ही पेन्शन मिळणे सुरु होईल.

अशा प्रकारे करू शकता नोंदणी
PM – SYM अंतर्गत कर्मचार्‍यांना मोबाईल फोन, सेव्हिंग्ज बँक खाते आणि आधार क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. पात्र नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन आधार क्रमांक आणि सेव्हिंग्ज बँक खाते / जन धन खात्याला स्वप्रमाणीत करून PM-SYM साठी नोंदणी करू शकतात.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like