फोन उचलण्यापुर्वीच समजणार काय आहे काम ?, Truecaller चं नवं फिचर

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – ट्रूकॉलरने (Truecaller) आपल्या युजर्ससाठी आता आणखी नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. ज्याच्या मदतीने, समोरचा व्यक्ती का ( why-someone-is-calling-you) फोन करतोय याबाबतची माहिती मिळणार आहे. म्हणजे कॉल रिसिव्ह करण्यापूर्वीच, कॉल का केला जातोय ते समजेल. कंपनी हे फीचर अँड्रॉईड युजर्ससाठी ग्लोबली रोलआउट करत आहे. जवळपास बहुतांश जणांच्या स्मार्टफोन मध्ये ट्रूकॉलर (Truecaller) अ‍ॅप असत. युजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह नसलेल्या, नंबर्सची माहिती याद्वारे मिळते. त्यानंतर कंपनीने आता युजर्ससाठी हे नवीन फिचर आणणार आहे. कॉल रिजन (Call Reason), शेड्यूल एसएमएस (Schedule SMS) आणि एसएमएस ट्रान्सलेशन (SMS Translate) असे ते नवीन फिचर असेल.

कॉल रिजन
या फीचरच्या मदतीने युजर्स कॉल करण्यापूर्वीच, त्याचं कारण सेट करू शकतील. त्यामुळे कॉल रिसिव्ह करणाऱ्याला, कॉल रिसिव्ह करण्यापूर्वीच, कॉलचं कारण समजणार आहे. हे कॉल पर्सनल, बिझनेस आणि अर्जेंट अशा कारणाने केले आहेत. या फीचरच्या मदतीने, कॉलवेळी एक नोटही पाठवता येईल. ज्यात कारण लिहिलेलं असेल. त्यामुळे ज्या युजर्सला नव्या नंबरवरून कॉल येत असतील, त्यांच्यासाठी हे फीचर मदतशीर ठरणार आहे.

शेड्यूल एसएमएस
शेड्यूल एसएमएस फीचरच्या मदतीने युजर्स एखाद्या मिटिंग, इव्हेंट किंवा आणखी काही कारणासाठी मेसेज रिमाइंडर शेड्यूल करू शकतील. या फीचरचा वापर करताना, मेसेज पाठवण्यापूर्वी डेट आणि टाईम सेट करावा लागेल. त्यामुळे युजरने ठरवलेल्या वेळेत SMS सेंड होईल.

एसएमएस ट्रान्सलेशन
या फीचरच्या मदतीने कोणत्याही इतर भाषेत आलेले संदेश, युजर आपल्या भाषेत भाषांतर करून वाचू शकेल. सर्व मेसेज लोकली प्रोसेस आणि ट्रान्सलेट केले जातील. हे फीचर 59 भाषांना सपोर्ट करतं, ज्यात 8 भारतीय भाषा आहेत. या फीचरमुळे इंग्रजीमध्ये आलेले मेसेज न समजणाऱ्या अनेकांना फायदा होणार आहे. फोनमध्ये SMS विदेशी भाषेत आल्यास, तो आपोआप डिटेक्ट होऊन, नव्या फीचरद्वारे ट्रान्सलेशन अवेलेबल असल्याच दाखवणार आहे.