‘तुम्ही पण पोटावर झोपता ? आतापासूनच सोडा ही सवय’, अन्यथा…

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – मानवी जीवनात झोप ही खूप महत्वाची आहे. सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पूर्ण झोप होणे गरजेचे आहे. कारण रात्रीची झोप ही दुस-या दिवशीची दिनचर्या ठरवून दिलेली असते. यासोबतच झोपण्याची चांगली सवय देखील तितकीच महत्वाची आहे. अनेकांना पोटावर झोपण्याची सवय असते. यामुळे त्यांना खूप आरामदायी वाटत असले तरी ते त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. पोटावर झोपल्याने अनेक समस्या जाणवू लागतात. तुम्हालाही पोटावर झोपण्याची सवय असेल तर आजच बदलून टाका.

सांधे आणि पाठीवर वाईट परिणाम
पोटावर झोपण्याने हळुहळु सांधे दुखी, मानदुखी, आणि पाठदुखीची वेदना सुरु होतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वेदनांमुळे रात्री झोप देखील पूर्ण होत नाही. दुसर्‍या दिवशी आपल्याला थकवा जाणवायला लागतो.

मानेमध्ये अन् डोक्यात वेदना
पोटावर झोपल्यामुळे मानदुखी होते. वास्तविक, डोके आणि मणका सरळ राहत नाही. तसेच डोकेदुखी होऊ लागते. पोटावर झोपताना मान फिरवावी लागते. ज्यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण योग्यरित्या होत नसल्याने डोकेदुखी सुरु होते.