कर्करोगाला अटकाव करतं तसंच मधुमेह, रक्तदाब व हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वरदान आहे ‘ड्रॅगन फ्रूट’ ! जाणून घ्या फायदे

मूळचं मेक्सिको आणि अमेरिकेचं असणारं ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) हे थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल व श्रीलंका या देशात लोकप्रिय आहे. यात प्रोटीन जास्त प्रमाणात असतात. यामुळं अनेक आजारांपासून सुटका होण्यास मदत होते. आज आपण या फळाचे फायदे जाणून घेणार आहोत.

1) शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याचा फायदा होतो.

2) हे फळ शरीरातील साखरेचं प्रमाणं नियंत्रित ठेवतं. याशिवाय पचनक्रिया सुधारण्यासाठीही याची मदत होते.

3) हे फळ पित्तनाशक असल्यानं आशियाई देशात याला पिताया म्हणूनही ओळखलं जातं.

4) यात व्हिटॅमिन सी, बी, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह यांचं प्रमाण अधिक आहे. सौंदर्यप्रसाधनातही याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. खास करून फेसमास्क, हेअर मास्क.

5) हे फळ आंबट असलं तरी यामुळं संधीवाताच्या वेदना कमी होतात. दात आणि हाडं मजबूत होतात.

6) हे फळ कर्करोगाला अटकाव करणारं असल्याचंही सांगितलं जातं.

7) याच्या सेवनानं आतडे निरोगी राहण्यास मदत होते.

8) यात ब जीवनसत्व भरपूर असल्यानं मेंदूचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी याची खूप मदत होते. तणाव कमी करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असं हे फळ आहे.

9) त्वचा टवटवीत, तजेलदार आणि चकचकीत ठेवण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

10) यात शर्करेचे प्रमाण अल्प असल्यानं मधुमेहासोबत रक्तदाब आणि हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हे फळ वरदान आहे. यातील अँटीऑक्सिडंट पेशी सदृढ करतात.

11) यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. यामुळं हाडं, हिरड्या आणि दात मजबूत ठेवण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.