Corona Vaccine News : ‘कोरोना’ लसीचे 2 डोस घेऊन वाचू शकतो जीव? ; तुमच्यासाठी कोणती लास प्रभावी? जाणून घ्या तज्ञांचे मत

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना महामारीच्या काळात एक वाद असाही चालू आहे की लसीचे दोन डोस घेतल्यानंतर जीव वाचु शकतो का? कोरोना लस किती प्रभावशाली आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होईल का? याशिवाय कोणत्या कंपन्याची लस चांगली आहे. कोणती लस जास्त प्रभावी आहे. देशामध्ये चालू असलेल्या या लसीच्या वादात अनेक लोकांच्या मनात हे प्रश्न निर्माण होत आहेत. यामध्येच भारत सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी लसीकरणाची गती वाढवली आहे. आता देशात १८ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व लोकांना लस दिली जाईल. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा नेमका कोणता परिणाम होईल. याबद्दल यशोदा रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. पीएन अरोडा यांनी भारतातील लसीकरण आणि लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असलेल्या प्रश्नांचे उत्तर दिले आहे. चला जाणून घेऊया त्यांची उत्तरे.

शंकेतून बाहेर या, संधीचा फायदा घ्या
>> त्यांच्या उत्तरांच्या क्रमात डॉ. अरोडा यांनी सर्वात आधी लोकांची जिज्ञासा आणि मनात येत असलेल्या शंकेवरील पडदा काढला आहे. ते म्हणाले की सरकारकडून देण्यात आलेली लस पूर्णपणे योग्य आहे. ती अनेक चाचण्यांनंतर सामान्य माणसांसाठी योग्य ठरली आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारे शंका घेण्याचे कारण नाही. ते म्हणाले की, आहे या कालावधीत कोविशील्ड आणि कोवॅक्सीन सामान्य मांसासाठी योग्य आहेत. ही देशामध्ये परीक्षण केल्यानंतर आणली आहे. त्यामुळे आपले मन स्वच्छ ठेवा असा आग्रह त्यांनी केला. COVID-१९ चा सामना करण्यासाठी ही पूर्णपणे प्रभावी आहे.

>> डॉ. अरोडा म्हणाले, सध्या बऱ्याच देशांमध्ये स्वतःच्या लसी तयार केल्या जात आहेत. ते म्हणाले की लस सरकार तयार करत नाही, तर जगातील निवडक औषध कंपन्या करत आहेत. त्यामध्ये सरकारांचा सहभाग नक्कीच आहे. आपल्या देशातील बऱ्याच सहकारी संस्था यावर नियंत्रण ठेवतात. ते म्हणाले की ज्याप्रमाणे कंपन्या आजारांचा सामना करण्यासाठी औषध तयार करतात, त्याचप्रमाणे जगातील काही कंपन्या कोरोना विषाणूंचा सामना करण्यासाठी लस तयार करीत आहेत. त्या सर्वांना स्वतःचे मार्ग आहेत. भारताने चाचणीनंतर दोन लस कंपन्यांना ही लस प्रदान करण्याचे आदेश दिले.

>>डॉ. अरोडा म्हणाले की नुकतेच रशियामध्ये विकसित झालेल्या स्पुतनिक व्ही या कोरोना लसीचा पुरवठा करण्यासाठी भारत सरकारने ग्रीन सिग्नल दिले आहेत. ते म्हणाले की सरकारने कोणतीही लस घेतल्यानंतर त्याचा एक प्रोटोकॉल असतो. त्याअंतर्गत, देशात या लसीची पुन्हा चाचणी केली जाते. त्यानंतर ती सर्वसामान्यांना दिली जाते. ते म्हणाले की ही एक तांत्रिक बाजू आहे, जी सर्वसामान्य लोकांना समजत नाही. यावर सरकार मोठ्या जबाबदारीने काम करते.

>> डॉ. अरोडा म्हणाले की लसीकरणाच्या बाबतीत भारत सरकार एक उदाहरण बनले आहे. विकसित देशही भारताच्या मागे आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारताची लसीकरण मोहीम सर्वात वेगवान ठरली आहे. आतापर्यंत देशात १२० दक्षलक्षाहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे.

>> ते म्हणाले की आपल्या देशातील लोकसंख्या पाहता सरकारचे लसीकरण धोरण अत्यंत प्रभावी ठरले आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लसीकरण करणे शक्य नव्हते आणि सर्वांना संरक्षण देणे देखील आवश्यक आहे. डॉ. अरोडा म्हणाले की १६ जानेवारी रोजी जेव्हा देशात लसीकरण सुरु झाले, तेव्हा सरकारने कोरोनाचा पहिला टप्पा डोळ्यासमोर ठेवून धोरण आखले. म्हणूनच, सरकारने अग्रभागी आणि वृद्धांना लस देण्याचे धोरण सर्वात प्रथम स्वीकारले. ते म्हणाले की कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात या दोन्हीत अधिक संसर्ग झाला. त्यामुळे त्यांना आणखीन धोका होता.

>> मार्चमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. कोरोनाच्या नवीन रूपाने मुले आणि तरुणांना लक्ष्य केले गेले आहे. म्हणून सरकारने ४५ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्यास प्रथम परवानगी दिली. यानंतर सरकारने म्हंटले आहे की आता १८ वर्षांवरील सर्व लोकांना १ मे पासून कोरोना लस देण्यात येईल असे सांगितले आहे. ही सरकारची वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध रणनीती आहे. सर्वसामान्यांनी याला सहकार्य केले पाहिजे, तरच आपण या विषाणूंचा पराभव करण्यात यशस्वी होऊ.

>> डॉ. अरोडा म्हणतात की, दोन डॉस घेतल्यानंतर कोरोना विषाणूचे परिणाम मर्यादित होतात आणि धोक्याची शक्यता कमी होते. असे म्हंटले जाऊ शकत नाही की लसीचे दोन डोस घेतल्यानंतर आपल्याला संसर्ग होऊ शकत नाही. दोन डोस घेतल्यानंतर आपल्याला संसर्ग होऊ शकतो. म्हणून आपण कोरोना प्रोटोकॉल देखील पाळला पाहिजे.