‘स्वाक्षरी’वरून जाणून घ्या आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   खूप जणांना प्रश्न पडतो की, सहीवरून तुमचं आरोग्य कसं राहील हे कळतं का? …तर मित्रांनो हो सहीवरून स्वस्थ व्यक्ती कळतात आणि आरोग्याचे पुढे येणारे किंवा आलेले आजारपण समजतात, तर आजच्या लेखात याबद्दल आपण जाणून घेऊयात.

* जर एखाद्या व्यक्तीची सही एक सरळ रेषेत नसेल किंवा वरती खालती, विस्कळीत (imbalanced) असते, अशा व्यक्तींना सतत हॉस्पिटलचे चक्कर करावे लागतात, म्हणजेच सतत आजारी असतात. शारीरिक कष्ट दर्शवतात.

* जर एखादा व्यक्ती सही करताना खूपदा पेन उचलत असेल, तर अशी व्यक्तीसुद्धा आजारी असते, अशा व्यक्तींना सहसा हाडांशी संबंधित रोग /आजार होतात.

* जर एखादा व्यक्ती सही करताना खूपदा खोडत असेल किंवा सही करताना अक्षरावर अक्षर लिहीत असेल (overlapping) किंवा सहीमध्ये खूप काटछाट करत असेल, तर अशा व्यक्तींना खूप काळ बरे न होणारे आजार होतात.

* जर एखादा व्यक्ती सही करताना त्याची सही जर खूप वर जात असेल म्हणजेच 60° किंवा त्यापेक्षा जास्त डिग्रीमध्ये वरती जात असेल, तर अशा व्यक्तींना गॅससंबंधित विकार उद्भवतात. अशा व्यक्तींना पाठ, मान व कंबर दुखीलापण सामाेरं जावं लागतं.

* जर एखादा व्यक्ती सही करताना प्रत्येक शब्द जर टोकदार, त्रिकोणासारखा काढत असतील तर अशा व्यक्तींना श्वसनाचे विकार असतात.

* जर सही करताना ती जर खूप खालच्या दिशेने जात असेल (downwards) असेल, तर अशा व्यक्तींना पाय, पायाशी संबंधित आजार होतात. यांच्या मनात नेहमी नैराश्याची भावना असते.

* जर तुम्ही सही करताना पहिले अक्षर किंवा पहिले अक्षर सोडून बाकीच्या शब्दांना जर तुम्ही लूपमध्ये म्हणजेच (circle) मध्ये कैद करून सारखं लिहीत असतील, तर अशा व्यक्तींना मानसिक आजार होतात, ती लोकं डिप्रेशनमध्ये जातात.

* पूर्ण सहीच तुम्ही एका गोलाकार (circle) मध्ये जर लिहीत असाल, तर ही कमी कार्यक्षमता (low energy) अशा व्यक्तींना मानसिक विकार होतात.

* जर तुमच्या सहीमध्ये i किंवा j येत असेल आणि त्यातील डॉट(टिम्ब) च्या जागी जर तुम्ही गोलाकार (circle) काढत असाल आणि कधी कधी कलाकृती म्हणून जर सहीच्या खालती वरती जर कुठेही गोलाकार (cirle) काढत असाल, तर अशा व्यक्ती लवकर मानसिक रूपाने खचतात.

* जर आपल्या सहीमधील सर्व अक्षरे अलिप्त असतील, तर अशी सहीसुद्धा डिप्रेशन दर्शवते .एकांत आवडायला लागेल, मानसिकता नकारात्मक होत जाईल.

* जर सहीमध्ये खूप काटछाट/ खाडाखोड केली किंवा पहिले किंवा कोणतेही एखादे अक्षर खोडत असताल, तर अशी व्यक्ती मानसिक दडपण दर्शवतो आणि संभवतः डिप्रेशनमध्ये जातात.

* सहीमधील कोणत्याही शब्दाचा भाग उलट (reverse) जात असेल, अशी व्यक्तीसुद्धा मानसिक दडपणात असते किंवा मानसिक दडपणाखाली येऊ शकते.

अशा प्रकारे आपण आज जाणून घेतलं की, सहीच्या वैशिष्ट्यानुसार मानसिक आणि शारीरिक रोगसुद्धा आपण ओळखू शकतो. महत्त्वाचं म्हणजे जर यावरील चुका जर तुम्ही करायच्या टाळल्यात, तर आपण यांच्या परिणामापासून दूर राहाल.

तुमच्या सहीबद्दल /लोगोबद्दल असणा-या प्रश्नांचा आम्ही स्वागत करतो. असे सर्व प्रश्न नवनीत क्रिएशन (NAVNEET CREATION)च्या फेसबुक पेजवर किंवा YOUTUBE चॅनेलवर कमेंटमध्ये विचारावेत, ही विनंती.

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (86051 12233)

क्रमशः

You might also like