आपल्या घरातुन ‘या’ गोष्टी काढा बाहेर, संसारातील सर्व ‘वैभव’ असेल तुमच्याजवळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्ञान मिळवण्यासाठी एक तरूण एका ऋषी मुनींच्या जवळ गेला, ज्ञानप्राप्तीनंतर शिष्याने गुरूला गुरूदक्षिण देण्याची इच्छा व्यक्त केली. गुरुने दक्षिणा म्हणून अशी गोष्ट मागितली जी एकदम निरर्थक असेल. शिष्या निरर्थक वस्तूच्या शोधात बाहेर पडला.

त्याने मातीच्या दिशेने हात नेला असता माती म्हणाली, तु मला निरर्थक समजतोस? तुला माहित नाही का, जागातील सारे वैभव माझ्या पोटातूनच प्रकट होते. या विविध वनस्पती, हे रूप, रस आणि गंध सर्व कोठून येते.

शिष्य पुढे गेला. थोड्या दूरवर जाऊन त्याने एक दगड उचलला. त्याने विचार केला हाच घेऊन जातो. एवढ्यात दगडातून आवाज आला. दगड म्हणाला, तु एवढा ज्ञानी असूनही मला निरर्थक का समजतोस. तुम्ही तुमचे घर आणि इतर इमारती कशाने बांधता. तुमच्या मंदिरातील देवाच्या प्रतिमा कशापासून बनवतात? माझ्या एवढ्या उपयोगानंतरही तू मला निरर्थक का समजतोस.

हे ऐकून शिष्य विचार करू लागला जर माती आणि दगड एवढे उपयोगी आहेत तर निरर्थक काय असू शकते? या वेळी त्याच्या मनातून एक आवाज आला की सृष्टीतील प्रत्येक पदार्थ उपयोगी आहे, तर मी गुरूला दक्षिणा म्हणून काय देऊ.

एवढ्यात त्याला रस्त्यात एक संत भेटले, तरूणाने त्यांना सर्वकाही सांगितले. संत हसले आणि तरूणाला म्हणाले, निरर्थक वस्तू त्या आहेत, ज्यापासून कुणाचेही भले होत नाही. व्यक्तीच्या आतील एक अहंकारच असे तत्व आहे, ज्याचा कोणताही उपयोग नाही. हे ऐकून शिष्य थेट गुरूजवळ गेला आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला. तो दक्षिणा म्हणून आपला अहंकार देण्यासाठी आला होता.

You might also like