फाशीची कोठडी ! मृत्यूपूर्वीचा एक तास ‘असा’ जगतो दोषी कैदी, जाणून घ्या ‘डेथ सेल’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येतील दोषींच्या फाशीची तयारी सुरु झाली आहे. यापूर्वी देशात अनेक दोषींनी फाशी देण्यात आली आहे. यावेळी चर्चा होते ती दोषींना फाशी देण्याच्या 1 तास आधीची. दोषींच्या फाशीच्या शिक्षेचे फरमान निघाल्यानंतर दोशींची रवानगी फाशीच्या कोठडीत केली जाते. त्यानंतर सुरु होते फाशी देण्याची तयारी.

अशी असते फाशीची कोठडी 
ही फाशीची कोठडी एक छोटीशी खोली असते. त्यात एक अंथरुण पाघरुण, पिण्यासाठी पाणी आणि चारही बाजूंना काळाकुट्ट आंधार, या कोठडीचे नाव असते फाशीची कोठडी. जेथे फाशीची शिक्षा सुनावलेल्या दोषींना ठेवले जाते.

कुठे असते फाशीची कोठडी
– इंग्रजांच्या जमान्यात तिहार तुरुंगाचा नकाशा तयार करण्यात आला होता ज्यात फाशीच्या कोठडीचा देखील नकाशा होता.
– ही कोठडी तुरुंग क्रमांक 3 मध्ये कैदींच्या बराक पासून बरेच दूर निर्जन स्थळी तयार करण्यात आली आहे.
– तुरुंगात काय होत आहे याची माहिती त्या कोठडीतील कैदीला आणि त्या कोठडीच्या सुरक्षा रक्षकाला माहिती नसते.

काय आहे डेथ सेल 
– डेथ सेल एक फाशीच्या कोठडी सारखी दिसणारी खोली आहे.
– जेव्हा दोषीची शिक्षा मागे घेतल्यानंतर त्यांना डेथ सेलमध्ये रवाना केले जाते आणि फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या फाशीच्या कोठडीत ठेवले जाते.
– फाशीची कोठडी आणि डेथ सेल साधारण तुरुंगापेक्षा वेगळे असते.
– या दोन्ही कोठडी इतक्या भयानक असतात की दोषीला मृत्यूचा साक्षात्कार होईल.
– या कोठडी मौत का कुवा सारख्या असतात.

तुरुंग क्रमांक 3 च्या ज्या बिल्डिंगमध्ये फाशीची कोठडी आहे, त्याच बिल्डिंगमध्ये एकूण 16 डेथ सेल आहेत. यात दोषीला एकट्याला सोडले जाते. त्याला फाशी होण्याच्या आधी 24 तासात फक्त अर्ध्यातासासाठी बाहेर काढले जाते. तर फाशीची कोठडी आणि डेथ सेलची सुरक्षा तमिळनाडू स्पेशल पोलीस करतात. मृत्यूच्या शिक्षेपूर्वी कैदीवर नजर ठेवण्यासाठी तमिळनाडू पोलीस दोन दोन तासांच्या शिफ्टने काम करत असतात. दोषींना या कोठडीत असे कपडे घालायला देत नाहीत ज्यांने ते स्वत:ला नुकसान पोहोचवू शकतील. या कैदीला पायजम्याचा नाडा देखील दिला जात नाही.

कशी दिली जाते फाशी 
कैदीने फाशीपूर्वी काय खाल्ले, कैदीचे आरोग्य यासारख्या अनेक बाबींचा फाशीपूर्वी विचार केला जातो. जेव्हा कैदीला फाशी दिली जात असते तेव्हा तुरुंगातील सर्व काम थांबवले जाते. प्रत्येक कैदी आपला सेलमध्ये किंवा आपल्या बराकमध्ये असतो. तुरुगांतील सर्व कामे बंद केली जातात.