home page top 1

काय सांगताय, हो आता ‘ब्लड ग्रुप’ वरून कळेल प्रत्येकाचा ‘स्वभाव’ !

पोलीसनामा ऑनलाइन – चेहऱ्यावरून स्वभाव तसेच हस्तरेषा आणि राशीवरूनही व्यक्तीचा स्वभाव सांगितला जातो, हे सर्वांनाच माहित आहे. पण, ब्लड ग्रुपवरून स्वभाव समजला तर ! हो, आता ब्लड ग्रुपवरूनही स्वभाव समजू शकतो. आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव जाणून घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप कोणता आहे, हे आधी जाणून घेतले तर त्याचा स्वभाव तुम्हाला लगेचच समजू शकतो. प्रत्येक ब्लड ग्रुपनुसार स्वभाव कसा असतो, याची माहिती आपण घेणार आहोत. यामुळे तुम्हीदेखील इतरांचे स्वभाव सांगू शकता.

असे असतात ब्लड ग्रुपनुसार स्वभाव

ए पॉझिटिव्ह अ(+) : ब्लडग्रुप ए पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगले नेतृत्वगुण असतात. अशी व्यक्तीचा सर्वांना एकत्र घेऊन विश्वासाने काम करण्यावर विश्वास असतो. हे लोक तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे असतात. त्यामुळे पटकन कुणावरही विश्वास ठेवत नाहीत. आकर्षक व्यक्तीमत्व असते. स्पष्टवक्ते असल्याने या ब्लड ग्रुपच्या व्यक्ती अनेकदा टीकेचे धनी होतात.

ए निगेटिव अ(-) : मेहनत केली तरच जीवनात यश मिळते, या सुत्रांवर या व्यक्तींची निष्ठा असते. या व्यक्ती मेहनती असतात. कठीण परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर त्या यश संपादन करतातच.

एबी पॉझिटिव्ह अइ(+) : या स्वभाव कसा आहे हे समजत नाही. तसा अंदाजही बांधता येत नाही. या व्यक्ती कधी काय विचार करतील हे कुणीही सांगू शकत नाही. त्यांच्या मनात कोणते विचार सुरू आहेत याबाबत अंदाज लावणेही कठीण असते.

एबी निगेटिव्ह अइ (-) : या व्यक्ती नेहमी वेगळा विचार करतात. हुशार असतात. सहजपणे समोरच्याचे बोलणे त्यांना चटकन समजते.

ओ पॉझिटिव्ह ज (+) : या व्यक्ती दुसऱ्यांना मदत करताना त्या कधीही मागेपुढे पहात नाहीत. नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यासाठी त्या तत्पर असल्याचे दिसते.

ओ निगेटिव्ह ०(-) : या व्यक्तींचे विचार खूपच संकुचित असतात. शिवाय त्या स्वार्थी असतात. दुसऱ्यांचा विचार करण्याआधी त्या स्वत:चा विचार करतात. नवे विचार सहजासहजी स्वीकारत नाहीत.

बी पॉझिटिव्ह इ(+) : या व्यक्ती दुसऱ्याला मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. दयाळूपणा हा त्याचा स्वभाव असतो. यांच्यासाठी नाती महत्त्वाची असतात. दुसऱ्यांसाठी नेहमी काही ना काही करत राहणे त्यांना आवडते.

आरोग्य विषयक वृत्त – 

जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही

गॅस्ट्रोबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, १२० रुग्ण बाधित

रेल्वे प्रवाशांना शंभर रूपयात मसाज सुविधा

अवघ्या २ रुपयांत कॅन्सरवर उपचार शक्य, एका डॉक्टरचा दावा

Loading...
You might also like