‘कनसे’ प्रमुखाचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घाला’

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी आणि कानडी भाषिकांमधील वाद हा काही नवीन नाही. कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी मराठी भाषिकांविरोधात आक्षेपार्ह टीका केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सीमेवर उभे करून गोळ्या घातल्या पाहिजे, असे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन अनेक वर्षे झाली तरी बेळगाव, निपाणी आणि कारवार हे मराठी भाषिक प्रदेश अजूनतरी महाराष्ट्रात सामील झालेले नाहीत. यावरूनच मराठी आणि कन्नड भाषिक लोकांमध्ये वाद होत आहेत.

अनेक वर्षांपासून बेळगावमधील जनतेला वेठीस धरले जात आहे. तसेच कर्नाटकमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. तेव्हा या एकीकरण समितीला खासदारांनी कधी जाब विचारला का, असा प्रश्न कनसेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केला आहे. एकदाचा निकाल लागला तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देऊ, असेही कनसेचे अध्यक्ष म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/